India vs Sri Lanka: भारत आणि श्रीलंका (Ind vs SL) यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका संपली. या मालिकेत टीम इंडियाने 3-0 अशा फरकाने श्रीलंकेचा पराभव केला. आता टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी वेगळा संघ असणार आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील समील होणार आहेत. तसेच हार्दिक पांड्या श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेत खेळताना दिसला. एकदिवसीय मालिकेतून त्याने माघार घेतल्याने तो आता मायदेशी परतणार आहे. टी-20 मालिकेतील शानदार विजयानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये खूप आनंदाचे वातावरण दिसले. मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिलीच मालिका होती. या विजयानंतर गौतम गंभीरने ड्रेसिंग रुममध्ये सर्व खेळाडूंसोबत संवाद साधत कौतुक केले. बीसीसीआयने टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ शेअर केला आहे.
गौतम गंभीर काय म्हणाला?
अप्रतिम मालिका विजयाबद्दल अभिनंदन. सूर्याचेही अभिनंदन. उत्तम कर्णधार आणि त्याची फलंदाजीही अप्रतिम होती. मी मालिका सुरू होण्यापूर्वी काहीतरी मागितले होते आणि तुम्ही ते दिले. जेव्हा तुम्ही सतत लढता, तेव्हा असेच घडते. तुम्ही हार मानू नका असा सामना करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धावासाठी लढत राहणे. या सामन्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे हा एक शानदार मालिका विजय आहे. काही खेळाडू 50 षटकांच्या फॉरमॅटच्या मालिकेत भाग घेणार नाहीत. एक मोठा ब्रेक असेल..., असं गौतम गंभीरने सांगितले.
हार्दिक पांड्या काय म्हणाला?
अप्रतिम...मला वाटतं की प्रथम फलंदाजी करणे हे एक आव्हान होते. परिस्थिती कठीण होती, परंतु लवकर विकेट्स गमावल्यानंतर, शुभमन गिल आणि रियान परागने ज्या प्रकारची फलंदाजी आणि भागीदारी केली ते खूप विलक्षण होते. तुम्ही दोघांनी जे केले ते खूप महत्वाचे होते आणि यामुळे आपण चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहचू शकलो. सूर्यकुमार यादवविषयी बोलताना गौतीभाईने सांगितल्याप्रमाणे...सूर्या, तू ज्या पद्धतीने गोलंदाजांचा वापर केला...खूप शानदार होते, असं हार्दिक पांड्या म्हणाला.
ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ-
वनडे मालिकेचे वेळापत्रक-
2 ऑगस्ट – पहिली वनडे (कोलंबो)
4 ऑगस्ट – दुसरी वनडे (कोलंबो)
7 ऑगस्ट – तिसरी एकदिवसीय (कोलंबो)
संबंधित बातमी:
गौतम गंभीर-सूर्यकुमार यादवचे 4 चक्रवणारे निर्णय; श्रीलंकेच्या थिंक टँकने विचारही केला नव्हता!