IPL 2025 Auction : आयपीएल 2025 चा मेगा लिलाव या महिन्यात म्हणजेच 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे होणार आहे. या मेगा लिलावात ऋषभ पंतसह अनेक स्टार खेळाडूंची नजर असेल. अलीकडेच जेव्हा सर्व संघांनी आपापल्या कायम ठेवलेल्या याद्या जाहीर केल्या होत्या, तेव्हा ऋषभ पंतचे नाव दिल्ली कॅपिटल्सच्या यादीत नव्हते. दिल्लीने पंतला सोडल्याचे स्पष्ट झाले. दिल्ली कॅपिटल्सच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. दिल्लीच्या या खेळीमुळे चाहतेही नाराज झाले असून त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे.


खरंतर, स्टार स्पोर्ट्सने आयपीएल मेगा लिलावापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये क्रिकेट दिग्गज सुनील गावसकर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्समध्ये परतण्याच्या शक्यतेबद्दल बोलत होते. या व्हिडीओमध्ये गावसकर सांगत आहेत की, जेव्हा एखाद्या खेळाडूला कायम ठेवावे लागते. तेव्हा फ्रँचायझी आणि खेळाडू यांच्यात पगाराबाबत बरीच चर्चा होते. आम्ही सर्वांनी पाहिले की काही खेळाडूंना कायम ठेवण्यात आले होते त्यांना नंबर-1 रिटेन्शन फीपेक्षा जास्त पैसे मिळाले. त्यामुळे वाटते की पंत आणि दिल्ली यांच्यात काही मतभेद असावेत, पण मला वाटते की डीसीला नक्कीच ऋषभ पंतला त्यांच्या संघात परत करायला आवडेल कारण त्यांना कर्णधाराची गरज आहे.




सुनील गावसकर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर काही वेळातच ऋषभ पंतचे उत्तर दिले. व्हिडिओला उत्तर देताना ऋषभ पंतने X वरील पोस्टमध्ये लिहिले की, 'माझे कायम न ठेवणे हे पैशासाठी नव्हते. हे मी ठामपणे सांगू शकतो. लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने चार खेळाडूंना कायम ठेवले होते. अक्षर पटेलला 16.5 कोटी, कुलदीप यादवला 13.5 कोटींमध्ये, तर दक्षिण आफ्रिकेचा स्टार ट्रिस्टन स्टब्सला 10 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. अनकॅप्ड यष्टीरक्षक अभिषेक पोरेलला दिल्लीने 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले.


ऋषभ पंत आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून म्हणजेच 2016 पासून दिल्ली कॅपिटल्समध्ये होता. 2022 मध्ये अपघातात जखमी झाल्यानंतरही दिल्ली संघाने त्याला आपल्यासोबत कायम ठेवले. मात्र, दिल्लीने पंतला आयपीएल 2025 पूर्वी सोडले. कर्णधार ऋषभ पंतकडे दुर्लक्ष करून दिल्लीने अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पोरेल यांना कायम ठेवले.


हे ही वाचा -


IND vs AUS Test Series : जिओ सिनेमा, सोनीवर नाही तर.... कुठे पाहू शकता भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामने लाइव्ह, जाणून घ्या सर्वकाही