IND vs AUS Test Series : जेव्हा-जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी क्रिकेटमध्ये सामना होतो तेव्हा जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या सामन्यावर खिळलेल्या असतात. भारत आणि ऑस्ट्रेलिया 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये आमनेसामने येणार आहेत. 5 सामन्यांच्या या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. अशा स्थितीत पहिला सामना जबरदस्त होण्याची अपेक्षा आहे. गेल्या दोन बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर पराभूत करणाऱ्या टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे.
खरंतर, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी रोहितच्या संघाला ऑस्ट्रेलियाचा किमान 4-0 असा पराभव करावा लागेल. अशा स्थितीत टीम इंडियाला 4-0 ने आपल्या मोहिमेची सुरुवात करायची आहे. मात्र, यावेळी भारताला आव्हान देण्यासाठी ऑस्ट्रेलिया पूर्णपणे सज्ज असेल. रोहित शर्माला पहिल्या कसोटीत खेळणे कठीण जात आहे. आता सलामीला कर्णधाराच्या जागी कोण येते हे पाहावे लागेल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका कधी, कुठे आणि कशी पाहता येईल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका जिओ सिनेमा किंवा सोनी लिव्हवर पाहायला मिळणार नाही, तर यावेळी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केली जाईल. याशिवाय चाहत्यांना डिस्ने + हॉटस्टार ॲपद्वारे या मालिकेच्या लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंदही घेता येणार आहे. या मालिकेच्या सामन्यांच्या वेळेबद्दल बरेच चाहते संभ्रमात आहेत. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांची वेळ वेगळी आहे. त्याच वेळी, शेवटच्या दोन कसोटी सामन्यांची सुरुवातीची वेळ सेम आहे. मात्र, सर्व सामन्यांचे साक्षीदार होण्यासाठी चाहत्यांना पहाटेच उठावे लागणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीचे पूर्ण वेळापत्रक
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहिली कसोटी : 22-26 नोव्हेंबर, पर्थ (7:50 AM)
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुसरी कसोटी : 6-10 डिसेंबर, ॲडलेड (भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30)
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिसरी कसोटी – 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन (5:50 AM)
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चौथी कसोटी – 26-30 डिसेंबर, मेलबर्न (5:00 AM)
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पाचवी कसोटी – 2-7 जानेवारी, सिडनी (5:00 AM)
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे -
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), सरफराज खान, विराट कोहली, प्रसीद कृष्णा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ. पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, हर्षित राणा, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशॅग्ने, नॅथन लायन, मिच मार्श , नॅथन मॅकस्विनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.