Fire in Pakistan Cricket Team Hotel : एकीकडे भारताने सीमा ओलांडण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद जाण्याची भीती आहे. दरम्यान सोमवारी एका हॉटेलला आग लागल्याची बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये पाकिस्तानच्या महिला क्रिकेटपटू राहत होत्या. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कराचीमध्ये सुरू असलेली राष्ट्रीय महिला एकदिवसीय स्पर्धा अचानक थांबवावी लागली. या आगीनंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. आग लागली तेव्हा बहुतांश खेळाडू हॉटेलबाहेर होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र यामुळे पाकिस्तानच्या व्यवस्थेवर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.
पीसीबीच्या एका सूत्राने सांगितले की, आग लागली तेव्हा पाच खेळाडू वगळता सर्व क्रिकेटपटू आणि अधिकारी मॅच किंवा नेट सेशनसाठी नॅशनल स्टेडियमवर होते. खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या मालमत्तेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. घटनेच्या वेळी हॉटेलमध्ये असलेल्या पाच खेळाडूंना पीसीबीने ताबडतोब बाहेर काढले आणि त्यांना हनिफ मोहम्मद हाय-परफॉर्मन्स सेंटरमध्ये सुरक्षितपणे हलवले म्हणून कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली नाही.
गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये होणार अंतिम सामना
खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत स्पर्धा मध्यंतरी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय पीसीबीला कोणत्याही हॉटेलमध्ये 100 खोल्याही मिळत नाहीत, ज्या आवश्यक सुविधांनुसार आहेत. आता राष्ट्रीय महिला एकदिवसीय स्पर्धेचा विजेता ठरवण्यासाठी, पीसीबीच्या प्रसिद्धीपत्रकात असे सांगण्यात आले आहे की इनव्हिन्सिबल्स आणि स्टार्स हे पॉइंट टेबलमध्ये टॉप-2 संघ आहेत. ती अंतिम सामना खेळणार आहे. अंतिम फेरीची तारीख आणि ठिकाण योग्य वेळी जाहीर केले जाईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीवर होणार परिणाम?
राष्ट्रीय महिला चॅम्पियनशिप दरम्यान हॉटेलला लागलेल्या आगीचा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वरही परिणाम होऊ शकतो. सुरक्षेच्या कारणास्तव भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. अशा परिस्थितीत हॉटेलमध्ये आग लागल्याची बातमी पीसीबीच्या अडचणी वाढवू शकते. भारत आणि पाकिस्तानमधील या वादावर काय तोडगा निघेल. पण या आठवड्याच्या अखेरीस आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे एका मीडिया रिपोर्टमध्ये समोर आले आहे.
हे ही वाचा -