IPL 2022:  भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 15) पंधराव्या हंगामाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, अद्यापही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघानं (RCB) त्याच्या कर्णधाराची घोषणा केली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज फॉफ डू प्लेसिसचं (Faf du Plessis) नाव आरसीबीच्या कर्णधारपदासाठी चर्चेत आहे. तर, ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यालाही कर्णधारपदाचा सर्वात मोठा दावेदार मानला जात आहे. या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यात मॅक्सवेल उपलब्ध नसल्यानं फॉफ सुरुवातीच्या सामन्यामध्ये आरसीबीचं कर्णधारपदाची जबाबदारी संभाळेल, असं सांगण्यात येतंय. आरसीबीच्या कर्णधारपदावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे माजी खेळाडू डेनियन विटोरीनं आपलं मत मांडलंय.


डेनियन विटोरी काय म्हणाला?
आरसीबीच्या कर्णधारपदावरून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे माजी खेळाडू डेनियन विटोरी म्हणाले की, "विराट कोहलीनं आरबीच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर फ्रँचायझी फॉफ डू प्लेसिस, मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक या तिघांपैकी एकाकडं कर्णधारपदाची जबाबदारी सोपवू शकते. सुरुवातीच्या काही सामन्यात फॉफकडं ही जबाबदारी दिली जाऊ शकते. सुरुवातीच्या तीन सामन्यात तो कर्णधारपद संभाळेल. जर, या तिन्ही सामन्यात संघानं विजय मिळवल्यास फॉफकडं आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात येईल. अन्यथा मॅक्सवेलकडं संघाची कमान सोपवली जाऊ शकते.आरसीबी दीर्घकालीन कर्णधार म्हणून मॅक्सवेलकडे पाहू शकते. कदाचित भविष्याचा विचार करता मॅक्सवेल पुढील तीन वर्षांसाठी बंगळुरू संघाचं नेतृत्व करेल"


विराटचा कर्णधारपदावरून पायउतार
विराटन आयपीएलच्या चौदाव्या हंगामानंतर आरसीबीचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. स्वत:साठी काही वेळ काढण्यासाठी आणि काही प्रमाणात कार्यभार कमी करण्याच्या उद्देशानं विराटनं आरसीबीचं कर्णधार पदं सोडण्याचा निर्णय घेतला होता.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha