LSG vs KKR, Match Live Updates : लखनौचा मोठा विजय, कोलकात्याचा 75 धावांनी पराभव

आयपीएलमध्ये (IPL 2022) आज लखनौ सुपरजायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत.

abp majha web team Last Updated: 07 May 2022 10:51 PM
लखनौचा मोठा विजय, कोलकात्याचा 75 धावांनी पराभव

लखनौच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर कोलकात्याचा 75 धावांनी पराभव केला. 

जेसन होल्डरचा कोलकात्याला आणखी एक धक्का

नारायणला बाद केल्यानंतर होल्डरने कोलकात्याला आणखी एक धक्का दिला... साऊदी बाद

सुनील नारायण बाद, कोलकाता पराभवाच्या छायेत

जेसन होल्डरने नारायणला बाद करत कोलकात्याला मोठा धक्का दिला. 

LSG vs KKR, Match Live Updates : कोलकात्याला आणखी एक धक्का

 LSG vs KKR, Match Live Updates : अनुकुल रॉयच्या रुपाने कोलकात्याला आणखी एक धक्का बसला आहे. अनुकुलला एकही धाव काढता आली नाही... आवेश खानने घेतली आणखी एक विकेट

LSG vs KKR, Match Live Updates : लखनौच्या विजयातील अडथळा दूर, रसेल बाद

 LSG vs KKR, Match Live Updates :  लखनौच्या विजयातील मोठा अडथळा असलेला आंद्रे रसेल बाद झाला. आवेश खानने रसेलला 45 धावांवर बाद केले.

LSG vs KKR : केकेआरच्या अडचणीत वाढ

केकेआर संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली असून 25 धावांवर त्यांचे 4 गडी तंबूत परतले आहेत. 

LSG vs KKR : केकेआरची खराब सुरुवात, दोन गडी बाद

केकेआर संघाची सुरुवात खराब झाली आहे. त्यांचा सलामीवीर बाबा इंद्रजीत शून्यावर बाद झाला असून कर्णधार अय्यरही 6 धावा करुन बाद झाला आहे. मोहसीन आणि चमिराने हे विकेट्स घेतले आहेत.

LSG vs KKR : केकेआरसमोर 177 धावांचे आव्हान

अखेरचं षटक भेदक टाकत दोन विकेट्स साऊदीने घेतल्यामुळे आता विजयासाठी केकेआरसमोर 177 धावांचे लक्ष्य आहे.

LSG vs KKR : शिवम मावीच्या षटकात 5 षटकार, एक विकेट

19 व्या षटकात केकेआरच्या शिवम मावीने स्टॉयनिसला बाद केलं आहे. पण त्याला या षटकात 5 षटकार लखनौने लगावले आहेत. यातील तीन स्टॉयनिसने तर दोन होल्डरने लगावले आहेत.

LSG vs KKR : कृणाल बाद

कृणाल पांड्याला आंद्रे रसेलनं तंबूत धाडलं आहे. कृणाल 25 धावा करुन बाद झाला आहे.

LSG vs KKR : दीपक हुडा बाद

एका तुफानी खेळीनंतर दीपक हुडा बाद झाला आहे. 27 चेंडूत 41 धावा करुन हुडा बाद झाला. रसेलच्या चेंडूवर श्रेयसने त्याची कॅच घेतली आहे.

LSG vs KKR : लखनौच्या 100 धावा पूर्ण

लखनौ सुपरजायंट्स संघाच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. सध्या दीपक हुडा फटेकबाज करत असून कृणाल त्याच्यासोबत उभा आहे.

LSG vs KKR : तुफानी अर्धशतक झळकावू डी कॉक बाद

अर्धशतक पूर्ण होताच डी कॉक झेलबाद झाला आहे. नारायणच्या चेंडूवर मावीने त्याची विकेट घेतली आहे.

LSG vs KKR : केएल राहुल शून्यावर बाद

लखनौचा कर्णधार केएल राहुल आज एकही धाव न करता तंबूत परतला आहे. श्रेयसनं त्याला धावचीत केलं आहे.

LSG vs KKR :कोलकाता अंतिम 11  

आरोन फिंच, नितीश राणा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, सुनील नारायण, बाबा इंद्रजीत, अनुकूल रॉय, टिम साउदी, हर्षित राणा, शिवम मावी 

LSG vs KKR : लखनौ अंतिम 11

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डिकॉक, दीपक हुडा,मार्कस स्टोइनिस, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, दुश्मंता चमिरा, मोहसिन खान, आवेश खान, रवी बिश्नोई 


 

LSG vs KKR : केकेआरने निवडली गोलंदाजी

कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.

LSG vs KKR : कोलकाता संभाव्य अंतिम 11  

केएल राहुल (कर्णधार),  मनीष पांडे, क्विंटन डिकॉक, दीपक हुडा,मार्कस स्टोइनिस, कृष्णप्पा गौथम, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, मोहसिन खान, आवेश खान, रवी बिश्नोई

LSG vs KKR : लखनौ संभाव्य अंतिम 11

आरोन फिंच, नितीश राणा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, अनुकूल रॉय, टिम साउदी, उमेश यादव, शिवम मावी 


 

LSG vs KKR : आज लखनौ-कोलकाता आमने-सामने

आयपीएलमधील(IPL 2022) आजच्या दिवसातील दुसरा सामना लखनौ सुपरजायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (lucknow supergiants and kolkata knight riders) या दोन संघात पार पडत आहे.

पार्श्वभूमी

LSG vs KKR, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजच्या दिवसातील दुसरा सामना लखनौ सुपरजायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (lucknow supergiants and kolkata knight riders) या दोन संघात पार पडत आहे. गुणतालिकेचा विचार करता आतापर्यंतच्या हंगामात लखनौने 10 पैकी 7 सामने जिंकल्याने 14 गुणांसह दुसरं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे आजचा विजय त्यांना पुढील फेरीचं तिकीट मिळवून देऊ शकतो. तर दुसरीकडे कोलकाता संघाने 10 पैकी 4 सामने जिंकल्याने 8 गुणांसह आठव्या स्थानी आहेत. त्याचं पुढील फेरीत पोहोचणं अवघड असलं तरी त्यांना विजय महत्त्वाचा असल्याने आजचा सामनाही चुरशीचा होऊ शकतो. 


आजचा सामना होणाऱ्या पुण्यातील एमसीए मैदानात (MCA Stadium, Pune) इतर मैदानांच्या तुलनेत कमी सामने झाल्याने तेथील खेळपट्टी अधिक चांगली आहे. त्यात सामना सायंकाळी असला तरी पुण्यातील तापमान पाहता दवाची अधिक अडचण दोन्ही इनिंगमध्ये येत नाही. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी देखील करु शकतो. पण यंदाच्या हंगामात बहुतांश संघानी दुसऱ्यांदा फलंदाजी करताना विजय मिळवला आहे.  


लखनौ अंतिम 11


केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डिकॉक, दीपक हुडा,मार्कस स्टोइनिस, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, दुश्मंता चमिरा, मोहसिन खान, आवेश खान, रवी बिश्नोई 


कोलकाता अंतिम 11  


आरोन फिंच, नितीश राणा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, सुनील नारायण, बाबा इंद्रजीत, अनुकूल रॉय, टिम साउदी, हर्षित राणा, शिवम मावी 


हे देखील वाचा-


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.