T-20 Cricket in Olympics : ऑलिम्पिकमध्येही क्रिकेटचा थरार, IOC कडून टी-20 ला मंजुरी
Cricket Return to Olympics : ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा थरार रंगणार आहे. लॉस एंजेलिस ऑलिम्पिक (LA Olympics 2023) मध्ये टी-20 क्रिकेटचा समावेश करण्यावर IOC अधिवेशनात शिक्कामोर्तब झाला आहे.
T-20 Cricket in LA Olympics 2028 : क्रिकेट वेड्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. ऑलिम्पिकमध्ये टी-20 क्रिकेट (T-20 Cricket in Olympics) चा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता ऑलिम्पिकमध्ये टी-20 ची थरार रंगणार आहे. 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये T20 क्रिकेट (T20 Cricket in Olympics) चा समावेश करण्याची शिफारस IOC ने मान्य केली आहे. यामुळे तब्बल 128 वर्षांनी (Cricket Return In Olympics) क्रिकेट पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये परतणार आहे. IOC अधिवेशनात टी-20 क्रिकेटचा ऑलिम्पिक (Los Angeles Olympics 2028) मध्ये समावेश करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे. 14 ते 16 ऑक्टोबर दरम्यान मुंबईत पार पडलेल्या IOC अधिवेशनात यासाठी मतदान झालं असून आता क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला आहे.
आता ऑलिम्पिकमध्ये पाहायला मिळणार क्रिकेटचा थरार
अमेरिकेत 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक (T-20 Cricket in Olympics 2028) स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर सोमवारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (International Olympic Committee) कडून यावर मतदान करण्यात आलं असून आता ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटही सामील झालं आहे.
IOC कडून क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिकमध्ये मंजूरी
2028 लॉस एंजेलिस येथील ऑलिम्पिकमध्ये आहे. 1900 मध्ये क्रिकेट ऑलिम्पिकचा एक भाग होता, त्यानंतर आता एका 128 वर्षांनंतर क्रिकेटची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री झाली आहे. ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणारे क्रिकेट टी-20 फॉरमॅटमध्ये असेल. याशिवाय स्क्वॅशला 2028 च्या ऑलिम्पिक खेळाचा भाग बनवण्यात येणार आहे. बैठकीत क्रिकेट आणि स्क्वॅशला 2028 साठी ग्रीन सिग्नल देण्यात आला. क्रिकेट आणि स्क्वॉशसह एकूण 5 खेळांचा समावेश असेल.
ऑलिम्पिक समितीकडून क्रिकेटच्या बाजूने मतदान
ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणारे क्रिकेट टी-20 फॉरमॅटमध्ये असेल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (International Olympic Committee) बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बोर्डाच्या शिफारशीला मान्यता दिल्यानंतर क्रिकेट संदर्भातील अंतिम निर्णय आयओसी सदस्यांच्या मतदानावर अवलंबून होतं. सोमवारी आयओसी सदस्यांनी मतदान करत ऑलिम्पिकमध्ये टी-20 क्रिकेट सामील करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे.
1900 नंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटची बोर्डाला शिफारस करताना आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक म्हणाले होते की, 'नवीन खेळ ऑलिम्पिकला नवीन खेळाडू आणि चाहत्यांशी जोडण्यात मदत करतात.' दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश यापूर्वी फक्त एकदा पॅरिस ऑलिम्पिक 1900 मध्ये होता. त्यावेळी ग्रेट ब्रिटनने अंतिम फेरीत फ्रान्सचा पराभव केला होता. नेदरलँड आणि बेल्जियमने माघार घेतल्यानंतरही हा एकमेव सामना होता.