नवी दिल्ली : आयसीसी टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 च्या संपल्या आहेत. भारत, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.  भारतानं ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी पराभूत केलं. भारताचा हा विजय पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंना सहन होत नसल्याचं चित्र आहे. भारताचा विजय इंजमाम उल हक आणि सलीम मलिक या दोघांना आवडलेला नाही. इंजमाम उल हक आणि सलीम मलिक या दोघांनी भारतीय संघावर बॉल टेम्परिंगचा आरोप केला.    


अर्शदीप सिंगनं  ज्यावेळी 15 वी ओव्हर टाकली त्यावेळी बॉल रिव्हर्स स्विंग होत होता. नव्या बॉलसह इतक्या लवकर बॉल रिव्हर्स स्विंग होणं अवघड आहे.  म्हणजेच 12 व्या आणि 13 व्या ओव्हरपर्यंत बॉल रिव्हर्स स्विंगसाठी योग्य झाला होता, असं इंजमाम उल हक म्हणाला. 


अर्शदीप सिंग 15 व्या ओव्हरमध्ये बॉलिंग करायला आला तेव्हा बॉल रिव्हर्स स्विंग होत होता.  पंचांना देखील त्यांचे डोळे उघडे ठेवले पाहिजेत, असं इंजमाम  म्हणाला.यावर सलीम मलिक यानं  म्हटलं की इंजी काही संघाच्या बाबतीत पंचांचे डोळे बंद असतात त्यामध्ये भारताचा समावेश आहे. आम्ही झिम्बॉब्वे विरुद्ध एक मॅच खेळत होतो. वसीम  अक्रमनं  बाजूनं बॉल ओला केला होता.  त्यावेळी सर्वांनी वाद घातला होता. मी तक्रार केली असता दंड करण्यात आला, असं सलिम मलिक म्हणाला. 


इंजमाम उल हकन म्हटलं की, पाकिस्तानी गोलंदांजांनी असं केलं असतं तर गदारोळ घातला गेला असता. 15 व्या ओव्हरमध्ये रिव्हर्स स्विंग  होता, म्हणजे काहीतरी गंभीर घडलं आहे, असं इंजमामनं म्हटलं. तर, सलीम मलिकनं म्हटलं की त्यावेळी म्हटलं होतं जवळ असलेल्या क्षेत्ररक्षकांवर देखील लक्ष ठेवलं पाहिजे.  


इंजमाम उल हकनं पुढं म्हटलं की जसप्रीत बुमराहची जी अॅक्शन आहे त्यातून रिव्हर्स स्वींग होऊ शकते. मात्र, काही गोलंदाजांसाठी बॉल चांगल्या प्रकारे तयार केला जातो. 


दरम्यान,  पाकिस्तानचा संघ देखील सुपर 8 मध्ये पोहोचलेला नाही. ग्रुप स्टेजमध्येच पाकिस्तानचं आव्हान संपलं होतं. पाकिस्तानला नवख्या अमेरिका संघाकडून पराभव स्वीकारावा लागला.  पाकिस्तानला अमेरिका आणि भारतानं पराभूत केल्यानं त्यांचं आव्हान ग्रुप स्टेजमध्ये संपलं. तर, भारतानं आतापर्यंत एकाही मॅच मध्ये पराभव स्वीकारलेला नाही. भारतानं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला देखील पराभवाचं पाणी पाजलं. आता भारताची उपांत्य फेरीत लढत इंग्लंड विरुद्ध होणार आहे. 


संबंधित बातम्या :  



T20 World Cup 2024 Ind vs ENG: ही शर्यत रे सेमी फायनलची!