Indian Cricket Team Head Coach: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वरिष्ठ पुरुष भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. सध्या राहुल द्रविड (Rahul Dravid) भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहे. द्रविड यांचा कार्यकाळ जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 नंतर संपणार आहे. याबाबत आता नवीन अपडेट्स समोर येत आहे. 


2 जूनपासून T-20 विश्वचषक सुरू होत आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या भूमीवर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्याचबरोबर टी-20 विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. मात्र, आता राहुल द्रविडनंतर कोणाला प्रशिक्षक बनवणार हा प्रश्न आहे. यासाठी अनेक दावेदारांची नावे पुढे येत आहेत. या स्पर्धकांमध्ये भारतासह जागतिक क्रिकेटमधील मोठ्या नावांचा समावेश आहे. आता श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी खेळाडू महेला जयावर्धनेच्या नावाची देखील चर्चा आहे. बीसीसीआयच मुख्य प्रशिक्षकासाठी महेला जयवर्धने याच्या नावाचा देखील विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. (BCCI have shown interest in Mahela Jayawardene as well for India's Head Coach)


कोणाच्या नावाची चर्चा?


स्टीफन फ्लेमिंग


न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगचे नाव प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे. सध्या स्टीफन फ्लेमिंग हे आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक आहेत. तो गेल्या 15 वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्जशी जोडला गेला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या यशात स्टीफन फ्लेमिंगचा मोठा वाटा मानला जातो. मात्र, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी स्टीफन फ्लेमिंग अर्ज करतात की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल, मात्र या खेळाडूचे नाव प्रबळ दावेदार म्हणून घेतले जात आहे.


गौतम गंभीर-


मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतम गंभीरचं नाव सध्या आघाडीवर आहे. राहुल द्रविडनंतर गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक होऊ शकतो. सध्या गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर आहे. याआधी गौतम गंभीर लखनै सुपर जायंट्सचा मेंटर होता.


जस्टिन लँगर-


जस्टिन लँगर आयपीएलमध्ये केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनै सुपर जायंट्सचे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक आहे. याशिवाय ते ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक राहिले आहेत. जस्टिन लँगरच्या प्रशिक्षणाखाली ऑस्ट्रेलियाने 2021 चा टी-20 विश्वचषक जिंकला. त्याचबरोबर आता भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत जस्टिन लँगरचे नाव प्रबळ दावेदार म्हणून समोर येत आहे.


संबंधित बातम्या:


आयपीएलमधील यशस्वी प्रशिक्षक घेणार राहुल द्रविडची जागा; बीसीसीआय करतेय चतुर दिग्गजाचा विचार


भारतीय क्रिकेट संघाचा पुढील प्रशिक्षक कोण असावा...?; पाकिस्तानच्या वसीम आक्रमने खुल्या मनानं नाव सांगितलं!