Indian Cricket Team Head Coach: आयपीएलमधील यशस्वी प्रशिक्षक घेणार राहुल द्रविडची जागा; बीसीसीआय करतेय चतुर दिग्गजाचा विचार
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार आहे. आगामी टी-20 वर्ल्डकप 2024 हा अमेरिकेत आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. (image credit-social media)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया टी-20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. अशा स्थितीत टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू झाला आहे. (image credit-social media)
न्यूझीलंडचे दिग्गज खेळाडू स्टीफन फ्लेमिंग यांना भारताचे नवे प्रशिक्षक बनवले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. याबाबत बीसीसीआय देखील स्टीफन फ्लेमिंग नावाचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. (image credit-social media)
फ्लेमिंग आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या पदासाठी कधी अर्ज करतात याची बीसीसीआयचे अधिकारी वाट पाहत आहेत. बीसीसीआयच्या अटींनुसार नवीन प्रशिक्षकाला तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.(image credit-social media)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. बीसीसीआयने सोमवारी (13 मे) रात्री उशिरा मुख्य प्रशिक्षक पदाच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या. उमेदवार सोमवार, 27 मे रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या पदासाठी अर्ज करू शकतील. (image credit-social media)
प्रशिक्षकांसाठी निवड प्रक्रिया अर्जांच्या पुनरावलोकनाद्वारे होईल, त्यानंतर वैयक्तिक मुलाखत आणि निवडलेल्या उमेदवारांचे मूल्यमापन होईल. (image credit-social media)
कोण आहे स्टीफन फ्लेमिंग?- 2009 पासून चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग हे नव्या प्रशिक्षकाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. असे झाले तर येत्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटची स्थिती बदलण्याची शक्यता आहे. फ्लेमिंगकडे उत्तम व्यवस्थापन कौशल्य आहे आणि त्याला सकारात्मक वातावरण निर्माण करून खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी कशी मिळवायची हे माहीत आहे. आयपीएलमधील चेन्नईचे प्रशिक्षक म्हणून त्याच्या यशाच्या टक्केवारीमुळे त्याच्याकडे टीम इंडियाचे नवीन प्रशिक्षक म्हणूनही पाहिले जात आहे.(image credit-social media)
नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ किती?-टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ 1 जुलै 2024 पासून सुरू होईल, जो 31 डिसेंबर 2027 पर्यंत चालेल. नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या कार्यकाळात, टीम इंडिया एकूण 5 ICC ट्रॉफी खेळणार आहे, ज्यात चॅम्पियन्स ट्रॉफी, T20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या 2 चषकांचा समावेश आहे.(image credit-social media)
राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक कधी झाले?-राहुल द्रविड नोव्हेंबर 2021 मध्ये वरिष्ठ पुरुष भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले. 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला होता, परंतु बीसीसीआयने काही दिवसांचा कार्यकाळ वाढवला होता. राहुल द्रविडसह, कोचिंग स्टाफच्या इतर सदस्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला, ज्यात फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांचा समावेश आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करू शकतात.(image credit-social media)
image 10