भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) जवळपास 37 वर्षांचा आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत सातत्याने अटकळ बांधली जात होती. याचदरम्यान रोहित शर्मा किती दिवस क्रिकेट खेळत राहणार? रोहित शर्मा क्रिकेटला कधी अलविदा करणार?, याबाबत रोहित शर्माने खुलासा केला आहे. गौरव कपूरच्या शो ब्रेकफास्ट विथ चॅम्पियनमध्ये करिअरव्यतिरिक्त इतर गोष्टींवरही रोहित शर्माने भाष्य केलं आहे.


गौरव कपूरच्या शो ब्रेकफास्ट विथ चॅम्पियनमध्ये रोहित शर्मा म्हणाला की, मी सध्या चांगला खेळत आहे, त्यामुळे पुढील काही वर्षे क्रिकेट खेळत राहण्याचा मी विचार करत आहे. मला विश्वचषक जिंकायचा आहे. आता कसोटी चॅम्पियनशिप 2025 आहे. मला वाटते भारत जिंकण्यात नक्कीच यशस्वी होईल, असं रोहित शर्माने सांगितले. 






50 षटकांचा विश्वचषक माझ्यासाठी महत्वाचा-


50 षटकांचा विश्वचषक हा माझ्यासाठी खरा विश्वचषक आहे. आम्ही 50 षटकांचा विश्वचषक पाहत मोठे झालो आहोत, असं रोहितने सांगितले. नुकतेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाला एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने विजेतेपदाच्या लढतीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा पराभव केला.






रोहित शर्माची कारकीर्द-


59 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त रोहित शर्माने 262 एकदिवसीय आणि 151 टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय त्याने आयपीएलचे 248 सामने खेळले आहेत. रोहित शर्माने कसोटी फॉरमॅटमध्ये 45.47 च्या सरासरीने 4138 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 12 शतकांव्यतिरिक्त त्याने 17 वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. वनडे फॉरमॅटमध्ये रोहित शर्माने 49.12 च्या सरासरीने 10709 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये रोहितच्या नावावर 31 शतके आणि 55 अर्धशतकं आणि तीन वेळा द्विशतकं झळकावण्याचा विक्रम आहे. 


संबंधित बातम्या:


MI vs RCB: पहिल्या 6 सामन्यानंतरच मानली हार...फाफ डू प्लेसिस संतापला, आरसीबीचा कर्णधार काय बोलून गेला?


आरसीबीच्या अडचणी वाढल्या, मुंबईला मोठा फायदा; पाहा आयपीएलचे Latest Points Table


रोहित शर्मासोबत मस्ती करताना दिसला विराट कोहली; मैदानात नेमकं काय घडलं?, पाहा Video