ICC Player Of the Month : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीकडून (ICC) दरमहिन्याला महिनाभरात दमदार खेळी करणाऱ्या खेळाडूला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ (ICC Player of the motnh) पुरस्कार दिला जातो. यंदाचा हा पुरस्कार महिला खेळाडूंमध्ये भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने जिंकला आहे. तर पुरुषांमध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) बाजी मारली आहे.






यंदा महिला खेळाडूंध्ये भारताची हरमनप्रीत कौरसह स्मृती मंधाना (Smriti Mandhana) देखील नॉमिनेट झाली होती. तसंच बांग्लादेशच्या निगर सुलताना हीलाही नामांकन मिळालं होतं. दरम्यान हरमनप्रीतने स्मृती आणि निगरला मागे टाकत पुरस्कार मिळवला आहे. दुसरीकडे पुरुष खेळाडूंमध्ये भारताचा अक्षर पटेलही नॉमिनेट होता. पण मोहम्मद रिझवानने अक्षरसह ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनला मागे टाकत ICC ने प्लेअर ऑफ द मंथ (ICC POTM) पटकावला आहे. हरमनप्रीतने सप्टेंबरमध्ये 6 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात 275 धावा केल्या. यावेळी तिने इंग्लंडविरुद्ध नाबाद 143 धावांची तुफान खेळी देखील केली. तिच्या या दमदार कामगिरीसाठीच तिला यंदाचा प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार देण्यात आला आहे. 


ICC प्लेयर ऑफ द मंथ अवार्ड


आयसीसीनं (ICC) क्रिकेटमध्ये उत्साह वाढवण्यासाठी हा पुरस्काराची सुरुवात केली होती. प्रत्येक महिन्याला हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान, पुरूष आणि महिला संघातील जे खेळाडू महिन्याभरात चांगली कामगिरी करून दाखवतात. त्यांची निवड करून त्यापैकी एकाला हा पुरस्कार दिला जातो. पुरुषांमध्ये वरील खेळाडूंना तर महिला क्रिकेटमध्ये भारताची हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि बांग्लादेशच्या निगर सुलताना यांना नामांकित करण्यात आलं आहे.


हे देखील वाचा-