IND vs SA : भारतीय संघान दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 7 विकेट्सने दमदार मात देत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. भारतासाठी मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हा करो या मरोचा सामना होता. त्यात या सामन्यात भेदक गोलंदाजी आणि तुफान फलंदाजी करत भारताने विजय अखेर मिळवलाचं. सामन्यात आधी नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारताने 278 धावांमध्ये द. आफ्रिकेला रोखलं. मग फलंदाजीला आलेल्या भारताने श्रेयस अय्यरचं शतक आणि ईशानच्या नाबाद 93 धावांच्या जोरावर सामना 7 विकेट्सने जिंकला, तर सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...


IND vs SA 10 महत्त्वाचे मुद्दे-



  1. सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. पण आज मात्र नाणेफेक जिंकूनही दक्षिण आफ्रिकेने सामना गमावला. 

  2. सामन्याबद्दल बोलायचं झालं दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

  3. ज्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं फलंदाजी येत 279 धावाचं लक्ष्य भारतासमोर ठेवलं.

  4. यावेळी दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डी कॉक आणि जनेमान मलान फलंदाजीला आले असता डी कॉकला 5 धावांवर सिराजनं तंबूत धाडलं. मलानलाही शाहबाजनं स्वस्तात माघारी धाडलं.

  5. पण त्यानंतर एडन मार्करमने रीझा हेंड्रीक्ससोबत मिळून दमदार अशी शतकी भागिदारी केली. रीझाने 74 तर मार्करमने 79 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला.

  6. त्यानंतर क्लासेनने 30 तर मिलरने नाबाद 35 धावांंचं योगदान देत संघाची धावसंख्या 278 पर्यंत नेली.

  7.  मग 279 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवात खास झाली नाही. कर्णधार शिखर धवन 13 धावा करुन पारनेच्या चेंडूवर बाद झाला. सलामीवीर शुभमनही 28 धावांवर तंबूत परतला.

  8. त्यानंतर मात्र ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या युवा खेळाडूंनी तुफान फटकेबाजी करत भारताचा डाव सावरला. ईशान किशन 93 धावा करुन बाद झाला.

  9. मग श्रेयसने आपला स्पीड वाढवला, त्याच्यासोबतीला संजूही आला. ज्यानंतर श्रेयसच्या नाबाद 113 आणि संजूच्या नाबाद 30 धावांच्या जोरावर भारताने सामना 7 विकेट्सने जिंकला.

  10. या सामन्यातील विजयामुळे भारताने मालिके 1-1 ची बरोबरी घेतली आहे. 



हे देखील वाचा-