Ishan Kishan at IND vs SA, 2nd ODI : रविवारी रांचीच्या मैदानात झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) सामन्यात भारताने 7 गडी राखून विजय मिळवला आहे. सामन्यात आधी  गोलंदाजी केल्यानंतर भारताने श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer Century) नाबाद शतकासह ईशान किशनच्या (Ishan Kishan) तुफानी 93 धावांच्या जोरावर सामना जिंकला. विशेष म्हणजे ईशानच्या घरच्या मैदानात सामना असताना त्याने विजयात मोलाची कामगिरी केल्याने तेथे उपस्थित फॅन्सनेही ईशानचं तोंडभरुन कौतुक केलं. ईशानने 84 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकार ठोकत 93 धावा केल्या. 7 धावांनी त्याचं शतक राहिलं, पण सामन्यानंतर फॅन्सनी मात्र ईशानजवळ घोळका करत त्याचं फार कौतुक केलं.  


यावेळी तिथे उपस्थित एका महिलेने ईशानशी बोलतना अगदी मजेशीर संभाषण केलं. ही महिला ईशानची शेजारी असल्यासारखं वाटत होतं. ती म्हणाली, ''मी कायम तुला सांगायचेना खेळताना माझ्या खिडकीची काच तोड, आता तुझी बॅटिंग बघून वाटतंय नक्कीच काच तुटेल.'' दरम्यान तिच्या या वक्तव्यावर ईशाननेही हो-हो असं करत अखेर तिथून निघताना जेवायला घरी कधी बोलवतायं असा भन्नाट रिप्लाय दिला. ईशान त्यावेळी सर्वच उपस्थितांशी भेटत होता आणि त्याचं होमग्राऊंड असल्याने अनेकजण त्याच्या जवळच्या ओळखीतील दिसून येत होते. बीसीसीआयनं या साऱ्यांचा व्हिडीओही पोस्ट केला आहे.


पाहा व्हिडीओ -






भारताचा 7 विकेट्सनी विजय


सामन्यात सर्वात आधी दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर डी कॉकला 5 धावांवर सिराजनं तंबूत धाडलं. मलानलाही शाहबाजनं स्वस्तात माघारी धाडलं. पण नंतर एडन मार्करमने 79 आणि रीझा हेंड्रीक्सने 74 धावा केल्या. अखेर क्लासेनने 30 तर मिलरने नाबाद 35 धावांंचं योगदान देत संघाची धावसंख्या 278 पर्यंत नेली. ज्यानंतर 279 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवात खास झाली नाही. कर्णधार शिखर धवन 13 धावा करुन पारनेच्या चेंडूवर बाद झाला. सलामीवीर शुभमनही 28 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर मात्र ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या युवा खेळाडूंनी तुफान फटकेबाजी करत भारताचा डाव सावरला. दोघांनी आपआपली अर्धशतकं पूर्ण करुन फटकेबाजी सुरुच ठेवली. पण तितक्यात अगदी अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचल्यावर ईशान किशन 93 धावा करुन बाद झाला. त्यानंतर श्रेयसने आपला स्पीड वाढवला, त्याच्यासोबतीला संजूही आला. ज्यानंतर श्रेयसच्या नाबाद 113 आणि संजूच्या नाबाद 30 धावांच्या जोरावर भारताने सामना 7 विकेट्सने जिंकला.  

हे देखील वाचा-