Jasprit bumrah replacement : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) ही भव्य स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यातच टीम इंडियाचा (Team india) स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाठीच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झाला आहे. पण अशात अजूनपर्यंत बुमराहची रिप्लेसमेंट बीसीसीआयनं जाहीर केली नसून रिप्लेसमेंट जाहीर करण्यासाठीची डेडलाईनही निघून गेल्यानं आता बीसीसीआय काय करणार हा प्रश्नच आहे.


बुमराह दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याच्या जागी कोण हा प्रश्न समोर असताना यासाठी दीपक चाहर आणि मोहम्मद शमी ही दोन नावचं आवर्जून समोर येत आहेत. दोघेही राखीव खेळाडू म्हणून विश्वचषकाच्या संघात आधीपासून आहेत. पण शमीला कोरोनाची बाधा झाल्यामुळे तर चाहरला पाठीची दुखापत झाल्यामुळे दोघेही सध्या नॅशनल क्रिकेट अकादमीत आहेत. त्यामुळे आता बुमराहची रिप्लेसमेंट कोण असणार? हे पाहावं लागेल. त्यात डेडलाईन निघून गेल्याने आता बीसीसीआयला आयसीसीकडे विशेष तरतूद करावी लागणार आहे. जेणेकरुन भारतीय संघात बुमराहची रिप्लेसमेंट म्हणून खेळाडू सामिल करता येईल. 


शमी संघात येण्याची शक्यता अधिक


चाहर आणि शमी अशा दोघांच्या नावाची चर्चा बुमराहची रिप्लेसमेंट म्हणून आहे. पण दोघेही सध्या काही कारणास्तव संघाबाहेर आहेत. दोघांनाही संघात सामिल होण्यापूर्वी फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. अशामध्ये शमीची रिकव्हरी बऱ्यापैकी झाली असून चाहर मात्र सध्या फिटनेस टेस्ट देण्यासाठी फिट नसल्याचं बीसीसीआय सूत्रांकडून समोर आलं आहे. त्यामुळे शमीच बुमराहची रिप्लेसमेंट म्हणून संघात येण्याची दाट शक्यता आहे. 


पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह विश्वचषकाबाहेर




मागील काही महिने बुमराह दुखापतीमुळे तसंच विश्रांती घेण्यासाठी संघात आत-बाहेर असल्याचं दिसून येत आहे. आता आशिया कपपूर्वी महिन्यात बुमराह इंग्लंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर आशिया कप सामन्यांनाही मुकला. त्यानंतर विश्वचषकाची तयारी म्हणून बुमराहला संघात पुन्हा बोलवण्यात आलं त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचे दोन सामने तो खेळला पण आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तो दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. दरम्यान बुमराहला दुखापतीतून सावरण्यासाठी योग्य वेळ दिला न गेल्याने तो आता पुढील काही महिने सामने खेळू शकणार नाही असं दिसून येत होत, ज्यानंतर आता तो संपूर्ण टी20 विश्वचषकाला मुकणार हे समोर आलं आहे. 




हे देखील वाचा-