India vs Bangladesh: बांगलादेशविरुद्धच्या (India vs Bangladesh) पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताने 376 धावा केल्या. भारताकडून अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्वीनने सर्वाधिक 113 धावा केल्या. तर रवींद्र जडेजाने 86, यशस्वी जैस्वालने 56 आणि ऋषभ पंतने 39 धावा केल्या. बांगलादेशकडून हसन महमूदने सर्वाधिक 5 विकेट्स पटकावल्या. 


भारताने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची  (Ind vs Ban) खराब सुरुवात झाली. डावाच्या सुरुवातीलाच जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि आकश दीपच्या (Akash Deep) गोलंदाजीवर बांगलादेशचे फलंदाज डगमगले. बांगलादेशचे अवघ्या 22 धावांवर 3 महत्वाचे फलंदाज बाद झाले. भारताकडून एक जसप्रीत बुमराह आणि दोन आकाश दीपने विकेट्स घेतल्या. 


तिन्ही फलंदाजांच्या दांडी गुल-


आकाश दीप मारक गोलंदाजी करत आहे. त्याने बांगलादेशला पहिल्या डावात दोन धक्के दिले आहेत. आकाश दीपने आधी झाकीरला बाद केले आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूत मोमिनुलला बाहेरचा रस्ता दाखवला. झाकीर अवघ्या 3 धावा करून बाद झाला. मोमिनुलला खातेही उघडता आले नाही.लंच ब्रेकपर्यंत बांगलादेशने पहिल्या डावात 3 गडी गमावून 26 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे बांगलादेशचे तिन्ही फलंदाज त्रिफळाचीत झाले आहेत नजमुल 15 धावा करून नाबाद आहे. तर मुशफिकुर रहीम 4 धावा करून नाबाद आहे. 


जसप्रीत बुमराहने घेतलेली पहिली विकेट, Video






आकाश दीपने घेतलेल्या दोन विकेट्स, Video






भारताचा पहिला डाव कसा राहिला?


नाणेफेक जिंकत बांगलादेशने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या दिवसअखेर 6 विकेट्स गमावत 339 धावा केल्या होत्या. आज पुन्हा फलंदाजीसाठी येताच टीम इंडियाला सातवा धक्का बसला. रवींद्र जडेजा 86 धावा करून बाद झाला. वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने त्याला झेलबाद केले. 343 धावांवर भारताने 7वी विकेट गमावली. त्यानंतर आकश दीपने अश्विनसोबत छोटी पण महत्वाची खेळी केली. त्याने 30 चेंडूत 17 धावा केल्या. तर जसप्रीत बुमराहने 7 धावा केल्या. अश्वीन 113 धावांवर झेलबाद झाला. केएल राहुलने 16, रवींद्र जडेजाने 86 धावा केल्या. 


संबंधित बातमी:


Ind vs Ban: टीम इंडियाला चुणूक लागलेली, विशेष सरावही केला; पण तो आला अन् कहर माजवला, कोण आहे हसन महमूद?


बांगलादेशविरुद्ध पहिल्याच दिवशी आर. अश्विनने मोडले अनेक विक्रम; आता वर्षांनुवर्षे तोडणे कठीण