बांगलादेशविरुद्ध पहिल्याच दिवशी आर. अश्विनने मोडले अनेक विक्रम; आता वर्षांनुवर्षे तोडणे कठीण
भारत आणि बांगलादेश यांच्यात सध्या मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईत खेळवण्यात येत आहे. (Image Credit-BCCI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने शतक झळकावले. (Image Credit-BCCI)
रविचंद्रन अश्विनने या शतकासह अनेक विक्रम देखील आपल्या नावावर केले आहेत. जे पुढील काही वर्षांत मोडणे शक्य नाही.(Image Credit-BCCI)
सर्वाधिक शतके ठोकणारा जगातील दुसरा खेळाडू-बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन 8व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक शतके ठोकणारा जगातील दुसरा आणि भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. या क्रमांकावर फलंदाजी करताना अश्विनने चौथे शतक झळकावले आहे. या बाबतीत न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू डॅनियल व्हिटोरी 5 शतकांसह पहिल्या स्थानावर आहे.(Image Credit-BCCI)
8 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना 50 पेक्षा जास्त धावा- रविचंद्रन अश्विन हा टीम इंडियाचा दुसरा खेळाडू बनला आहे ज्याने 8 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे. अश्विनने 13 वेळा ही कामगिरी केली आहे. (Image Credit-BCCI)
500 बळी आणि 6 शतके करणारा अश्विन पहिला खेळाडू-अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचला आहे, जो सध्या तरी मोडणे शक्य नाही. अश्विन हा जगातील एकमेव असा खेळाडू आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये 500 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत आणि 6 शतके झळकावली आहेत. स्टुअर्ट ब्रॉड आणि अनिल कुंबळे यांच्या नावावर कसोटीत 500 बळी आणि फक्त एकच शतक आहे.(Image Credit-BCCI)
अश्विनचा चेन्नईतील रेकॉर्ड- रविचंद्रन अश्विन हा तामिळनाडूमधून आला असून त्याच्या घरच्या मैदानावरील फलंदाजीचा विक्रमही चांगला आहे. आतापर्यंत त्याने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर 5 कसोटी सामन्यांच्या 7 डावात 331 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सरासरी 55 पेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, बॉलिंगवर नजर टाकली तर अश्विनने चेन्नईच्या स्टेडियममध्ये आतापर्यंत 30 हून अधिक विकेट घेतल्या आहेत. (Image Credit-BCCI)
बांगलादेशच्या हसन महमूदनेही रचला विक्रम- बांगलादेशच्या हसन महमूदनेही एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. मायदेशात भारताविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 4 बळी घेणारा विदेशी गोलंदाज म्हणून हसन 2000 नंतर दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने पहिल्या दिवशी टीम इंडियाविरुद्ध 58 धावांत 4 विकेट्स घेतल्या होत्या. यापूर्वी 2008 साली दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू डेल स्टेनने अहमदाबादमध्ये 23 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या. (Image Credit-BCCI)