ENG vs IND: निर्णायक सामन्यात भारताचा पाच विकेट्सनं विजय, वाचा सामन्यातील 10 महत्वाचे मुद्दे
ENG vs IND: हार्दिक पांड्या (Hardik Pandya), ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं निर्णायक सामन्यात इंग्लंडचा (England Vs India) पाच विकेट्सनं पराभव केला.
ENG vs IND: हार्दिक पांड्या (Hardik Pandya), ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं निर्णायक सामन्यात इंग्लंडचा (England Vs India) पाच विकेट्सनं पराभव केला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं दिलेल्या 260 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची दमछाक झाली. परंतु, हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांच्या जोडीनं संघाचा डाव सावरून भारताच्या विजयाचा पाया रचला.
भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्याचे दहा महत्वाचे मुद्दे-
इंग्लंडविरुद्ध अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या सामन्यातील सुरुवातीपासून भारतीय संघानं भेदक गोलंदाजी करत इंग्लंडच्या संघाला बॅकफूटवर ढकललं.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 45.5 षटकांत 259 धावांवर गारद झाला.
इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरनं सर्वाधिक 60 धावा केल्या. बटलरशिवाय जेसन रॉयनं 41 धावा, मोईन अलीनं 34 धावा , क्रेग ओव्हरटननं 32 धावा केल्या.
भारताकडून हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करत 7 षटकात 24 धावा देत 4 विकेट्स घेतले.
इंग्लंडनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. भारतानं पाच षटकात दोन विकेट्स गमावल्या.
रोहित शर्मा, शिखर धवन बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवही स्वस्तात माघारी परतला.
त्यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्यानं भारतीय संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. दोघांमध्ये पाचव्या विकेट्ससाठी 133 धावांची भागेदारी झाली.
36 व्या षटकात हार्दिक पांड्या बाद झाला. यानंतर पंतनं जाडेजासोबत सहाव्या विकेटसाठी 40 चेंडूत 56 धावांची भागीदारी करून भारताला विजय मिळवून दिला.
इंग्लंडकडून रीस टोप्लेनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, कार्स आणि ऑर्टनला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
हे देखील वाचा-