India vs England Live : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना (2nd ODI) सामना लॉर्ड्सच्या मैदानात खेळवला जाणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने तब्बल 10 विकेट्सनी विजय मिळवल्यानंतर मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. ज्यानंतर आजचा सामना जिंकल्यास भारत मालिकाही जिंकेल. तर इंग्लंडसाठी बरोबरी करण्याकरता आजचा सामना महत्त्वाचा आहे. तर अशा या चुरशीच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा एकदिवसीय सामन्यातील रेकॉर्ड पाहूया... 


भारत-इंग्लंड हेड टू हेड रेकॉर्ड


एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंडचा संघ आतापर्यंत 104 वेळा आमने सामने आले आहेत. यावेळी भारताचं पारडं इंग्लंडसमोर जड राहिलं असून भारताने या सामन्यांतील 56 सामने जिंकले आहेत. तर, 43 सामने इंग्लंडने जिंकले आहेत. याशिवाय, दोन सामने अनिर्णित आणि तीन सामन्यांचा निकाल नाही लागला. भारत आणि इंग्लंड यांच्यात शेवटची एकदिवसीय मालिका 2021 मध्ये खेळली गेली होती. त्यावेळी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतानं 2-1 नं विजय मिळवला होता. सध्या सुरु मालिकेतही भारत 1- ने आघाडीवर आहे.



भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शिखन धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह. 



इंग्लंडचा संघ-
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, क्रेग ओव्हरटन, मॅथ्यू पार्किंसन, जो रूट, जेसन रॉय, फिल साल्ट, बेन स्टोक्स, रीसे टॉपली, डेविड व्हिली.


हे देखील वाचा-