India vs England Live : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात आज (14 जुलै) दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा भारतीय क्रिकेट संघाचा इरादा असणार आहे. इंग्लडसोबत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आहे. यामधील दुसरा एकिदवसीय सामना आज खेळवला जात आहे. इंग्लंडच्या लंडन येथील प्रसिद्ध अशा लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत आपलं स्थान कायम राखण्याचं इंग्लडपुढे आव्हान आहे. त्यामुळं आता इंग्लडच्या संघासाठी आजचा सामना हा 'करो या मरो' चा असणार आहे.  दरम्यान, भारतानं तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 असी आघाडी घेतली आहे. 


लंडनमधील प्रसिद्ध अशा लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर आजचा सामना खेळवलसा जाणार आहे.  संध्याकाळी साडेपाच वाजता हा सामना सुरु होईल. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना जिंकणाऱ्या भारतीय संघाला हा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घ्यायची आहे. तर दुसरीकडे, इंग्लंडसाठी करो या मरो अशी स्थिती आहे. इंग्लंडला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे.


लॉर्ड्स भारातानं आठपैकी चार विजय मिळवले आहेत
 
भारतीय संघाने टी-20 मालिकेत धमाकेदार कामगिरी केल्यानंतर एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना एकतर्फी जिंकला होता. दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघ ही गती कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यातही विराट कोहली खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळं मागील सामन्यात जो संघ होता तोच  संघ राहण्याची शक्यता आहे. तर इंग्लडच्या संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत टीम इंडियाने लॉर्ड्सच्या मैदानावर एकूण आठ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापैकी चार सामन्यांत विजय मिळवला आहे. तर तीन सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 1 सामना बरोबरीत सुटला आहे.


गोलंदाजांनी मत मिळण्याची शक्यता


लॉर्ड्सच्या खेळपट्टी नेहमीच वेगवा गोलंदाजांना साथ देते. यावेळी मौदानावर हलके हिरवे गवतही आहे. अशा स्थितीत गोलंदाजांना थोडीफार मदत मिळण्याची शक्यता आहे. तसे पाहता ही खेळपट्टी फलंदाजीसाठीही चांगली मानली जात आहे. नाणेफेक जिंकणारा संघ येथे प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. आज लंडनमध्ये हवामान स्वच्छ असणार आहे.  तिथे तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास असणार आहे.


भारताचा एकदिवसीय संघ-


रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह