![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IND vs WI, 2nd T20 Probable Playing 11 : स्फोटक फलंदाज दीपक हुडा संघात परतण्याची शक्यता, दुसऱ्या टी20 साठी कशी असेल भारताची अंतिम 11
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी20 मालिकेतील पहिला सामना भारताने दमदार फरकाने जिंकला असल्याने दुसऱ्या सामन्यात जास्त बदल संघ करणार नाही.
![IND vs WI, 2nd T20 Probable Playing 11 : स्फोटक फलंदाज दीपक हुडा संघात परतण्याची शक्यता, दुसऱ्या टी20 साठी कशी असेल भारताची अंतिम 11 India vs West Indies 2nd T20 india will play with deepak hooda know indias probable playing 11 IND vs WI, 2nd T20 Probable Playing 11 : स्फोटक फलंदाज दीपक हुडा संघात परतण्याची शक्यता, दुसऱ्या टी20 साठी कशी असेल भारताची अंतिम 11](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/2b5c650c5f8b62fe2c413d855b860b89_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs West Indies 2nd T20, Playing XI: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील टी20 मालिकेमधील दुसरा सामना काही वेळात सुरु होणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर आता टी20 सामन्यांना सुरुवात झाली असून भारताने पहिला सामना जिंकत मालिके 1-0 ची आघाडी देखील घेतली आहे. एकदिवसीय मालिकेत विश्रांतीवर असणारे दिग्गज खेळाडू संघात परतले असून त्यानंतर भारताने पहिल्या टी20 मध्ये एका मोठ्या विजयाची नोंद केली. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात संघात जास्त बदल होणार नाहीत.मात्र सध्या कमाल फॉर्ममध्ये असणारा दीपक हुडा संघात परतू शकतो.
मागील काही काळापासून दीपक हुडा अगदी तुफान फॉर्ममध्ये आहे. मिडल ऑर्डर फलंदाद असणारा दीपक कोणत्याही जागी फलंदाजीला येऊन कमाल करताना दिसत आहे. पण पहिल्या टी20 सामन्यात तो अंतिम 11 मध्ये नव्हता. पण त्याचा फॉर्म पाहता दुसऱ्या सामन्यात त्याला संघात जागा मिळू शकते. सूर्यकुमार यादव किंवा श्रेयस अय्यर यांच्या जागी त्याला संधी दिली जाऊ शकते. हे दोघेही चांगले खेळाडू असले तरी पहिल्या सामन्यात फेल झाले होते, ज्यामुळे हुडाला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर नेमकी अंतिम 11 कशी असू शकते हे पाहूया...
संभाव्य भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर/दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक, दीपक हुडा, हार्दीक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, रवी बिश्नोई.
आजचा सामना होणाऱ्या वॉर्नर पार्कमध्ये फलंदाजी करणं काहीसं अवघड असल्याने चेस करणाऱ्या संघाला अधिक फायदा होत असल्याचं दिसून आलं आहे. तसंच गोलंदाजांना अधिक मदत या पिचवर मिळत असल्याने आज देखील नाणेफेक जिंकणार संघ प्रथम गोलंदाजी निवडण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान बऱ्याच काळानंतर या मैदानावर सामना होत असल्याने एक फ्रेश खेळपट्टीवर दोन्ही संघ उतरतील त्यामुळे फलंदाजांना फायदा होण्याची शक्यताही आहे. त्यामुळे एक चुरशीचा सामना आज क्रिकेट रसिंकाना पाहायला मिळेल.
हे देखील वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)