India vs west Indies 1st odi Live Update : भारतीय संघाने 1000 वा एकदिवसीय सामना जिंकला, वेस्ट इंडिजचा सहा गडी राखून पराभव

India vs west Indies 1st odi Live Update : भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरूवात झाली. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

धनाजी सुर्वे Last Updated: 06 Feb 2022 07:46 PM
भारतीय संघाने 1000 वा एकदिवसीय सामना जिंकला, वेस्ट इंडिजचा सहा गडी राखून पराभव

भारताचे चार फलंदाज तंबूत, 19 षटकानंतर चार बाद 129 धावा

 भारताचे चार फलंदाज तंबूत, 19 षटकानंतर चार बाद 129 धावा. विजयासाठी भारताला आणखी 49 धावांची आवश्यकता 

भारताला दुसरा धक्का, विराट कोहली स्वस्तात बाद

रोहितनंतर विराटही बाद,  14 षटकानंतर भारताच्या दोन बाद 93 धावा 

भारताला पहिला धक्का, कर्णधार रोहित शर्मा 60 धावांवर बाद

भारताला पहिला धक्का, कर्णधार रोहित शर्मा 60 धावांवर बाद   
13 षटक आणि 4 चेंडूनंतर भारताच्या एक बाद 93 धावा.  इशान 18 तर विराट कोहली 8 धावांवर खेळत आहेत. 

कर्णधार रोहित शर्माचे अर्धशतक, भारताच्या 11 षटकानंतर बिन बाद 77 धावा

44 चेंडूत 8 चौकार आणि एका षटकारासह रोहितने पूर्ण केले अर्धशतक. भारताच्या 11 षटकानंतर बिन बाद 77 धावा 

रोहित-इशानची सुसाट सुरुवात, भारताच्या सात षटकानंतर 40 धावा

सात षटकांच्या खेळात भारतीय संघाकडून सात चौकार खेचले. यात रोहितने पाच तर इशानने दोन चौकार मारले   

विजयासाठी भारताला 177 धावांची आवश्यकता 

वेस्ट इंडिजच्या संघाला 43 षटक आणि 5 चेंडूत फक्त 176 धावा करता आल्या.  


 युझवेंद्र चहलने सर्वाधिक जास्त म्हणजे चार गडी बाद केले तर वॉशिंग्टन सुंदरने तीन गडी बाद केले. 


 

30 षटकानंतर वेस्ट इंडिजच्या 7 बाद 115 धावा

प्रसिद्ध कृष्णाला सातव्या षटकात पहिला बळी मिळाला. त्याने अकील हुसेनला झेलबाद केले. 30 षटकांनंतर वेस्ट इंडिजच्या 7 बाद 115 धावा 

 वेस्ट इंडिजचा निम्मा संघ तंबूत, 22 षटकानंतर सहा बाद 78 धावा

 वेस्ट इंडिजचा निम्मा संघ तंबूत, 22 षटकानंतर सहा बाद 78 धावा


चहलने पूरन-पोलार्डला लागोपाठ दोन चेंडूत केले बाद 

वेस्ट इंडिजने 50 धावांत गमावली तिसरी विकेट, वॉशिंग्टन सुंदरने एका षटकात दिला दुहेरी धक्का 

वेस्ट इंडिजने 50 धावांत गमावली तिसरी विकेट, वॉशिंग्टन सुंदरने एका षटकात दिला दुहेरी धक्का 


वेस्ट इंडिजच्या 13 षटक आणि तीन चेंडूत तीन बाद 51 धावा


 

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी संघातील सर्व खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून खेळत आहेत.  

भारतीय संघ आपल्या 1000 व्या एकदिवसीय सामन्यात कोणताही उत्सव साजरा करणार नाही. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी संघातील सर्व खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून खेळत आहेत.  

पार्श्वभूमी

India vs west Indies 1st odi Live Update : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरूवात झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय.


 भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीज च्या सहा षटकांत एक बाज 28 धावा झाल्या आहेत.  


आज होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात ईशान किशनचा समावेश करण्यात आला आहे. शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड या सलामीच्या फलंदाजांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे हे दोघे आजचा सामना खेळू शकणार नाहीत. तर उपकर्णधार लोकेश राहुलनंही वैयक्तिक कारणास्तव पहिल्या वनडेतून माघार घेतली आहे. आज रोहित शर्मासोबत इशान किशन ओपनिंग करणार आहे. रोहित आणि इशान ही जोडी पहिल्यांदाच टीम इंडियाकडून ओपनिंग करणार आहे. 


 भारतीय संघ आज आपला 1000 वा एकदिवसीय सामना खेळणार आहे. आतापर्यंत कोणत्याही संघानं 1000 सामने खेळले नाहीत. 1000 सामने खेळणारा भारत पहिला क्रिकेट संघ ठरणार आहे.


दरम्यान, भारतीय संघ आपल्या 1000 व्या एकदिवसीय सामन्यात कोणताही उत्सव साजरा करणार नाही. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी संघातील सर्व खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून खेळत आहेत. लता मंगेशकर यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.   


भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रशांत कृष्णा


वेस्ट इंडिज संघ
कायरन पोलार्ड (कर्णधार), शाई होप (विकेटकीपर), ब्रँडन किंग, निकोलस पूरन, शामर ब्रूक्स, ड्वेन ब्राव्हो, फॅबियन ऍलन, जेसन होल्डर, अकील हुसेन, केमार रोच, अल्झारी जोसेफ


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.