(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SL T20 Series : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यापूर्वी रोहितने केले बुमराहचे कौतुक, केएल राहुलबद्दलही म्हणाला...
IND vs SL T20 Series: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी खेळाला जाणार आहे.
IND vs SL T20 Series: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी खेळाला जाणार आहे. हा सामना लखनौमध्ये होणार आहे. याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्माने बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये रोहितने तीन फॉरमॅटचा कर्णधार झाल्याबद्दलही आपली प्रतिक्रिया दिली. यासोबतच रोहितने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे कौतुक केले आहे. तसेच त्यांनी केएल राहुलबद्दलही वक्तव्य केले.
तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार झाल्यानंतर पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया देत रोहित शर्मा म्हणाला, “तीन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार होणे ही एक वेगळीच भावना आहे. मला ही संधी मिळाली आहे, याचा मला खूप आनंद आहे. उपकर्णधार जसप्रीत बुमराहचा उल्लेख करताना तो म्हणाला, "गोलंदाज किंवा फलंदाज हा उपकर्णधार आहे की नाही, याने काही फरक पडत नाही. पण हो, बुमराहकडे ग्रेट क्रिकेटिंग माईंड आहे. नेतृत्वाच्या भूमिकेत पुढे जाण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.''
बुमराह, राहुल आणि पंत भविष्यात कर्णधारपदाचे दावेदार
केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्याबद्दल कर्णधार रोहित म्हणाला, "जर तुम्ही जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर या लोकांना भारतीय क्रिकेटसाठी भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता आहे, पुढे भारतीय संघाच्या कर्णधारपदाचे हेच दावेदार आहेत.'' युवा खेळाडूंच्या कामगिरीबद्दल रोहित म्हणाला, "तरुण खेळाडूंची चांगली कामगिरी करताना पाहून आनंद होतो. पण वरिष्ठ खेळाडूंना दुखापतींशी झुंजताना पाहणे मला जड जात आहे. दुखापतींशी झुंजतानाचा हा काळ किती कठीण असतो, हे मला माहीत आहे."
हे ही वाचा -
-
Ind vs Sl T20 : टी-20 मालिकेपूर्वी भारताला आणखी एक धक्का, 'हा' स्फोटक फलंदाज झाला संघाबाहेर
- ICC T20 Rankings : टीम इंडियाने रचला इतिहास! T-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्था
- Gujarat Titans Logo: गुजरात टायटन्सचा लोगो रिलीज, हार्दिक पांड्या दिसला अनोख्या अंदाजात
- Road Safety World Series: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लवकरच मैदानात, 'या' चार शहरांमध्ये खेळवले जातील सामने