IND vs SL, 3rd ODI : भारत-श्रीलंका तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कशी असेल दोन्ही संघाची प्लेईंग 11? हेड टू हेड रेकॉर्ड, वाचा सविस्तर
IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात आजवर तब्बल 163 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये भारताचं वर्चस्व दिसून आलं आहे.
India vs Sri lanka, 3rd ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना (IND vs SL) आज (15 जानेवारी) दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. दोन्ही संघ तिरुवनंतीपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर एकमेंकांशी भिडतील. मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने जिंकल्यामुळे मालिका भारताची झाली आहे. आज भारताकडे क्लिन स्विप देण्याची संधी आहे. दरम्यान आजचा सामना मालिकेच्या निकालावर कोणताही बदल आणणार नसल्याने भारत काही बदल करुन संधी न मिळालेल्या खेळाडूंना संधी देऊ शकतो.
दरम्यान आजच्या सामन्यात मोहम्मद शमीला विश्रांती देऊन अर्शदीप सिंह याला अंतिम 11 मध्ये संधी मिळू शकते. अर्शदीपने टी20 विश्वचषकात दमदार कामगिरी केल्यामुळे एकदिवसीय विश्वचषकापूर्वी त्याला अधिक वनडे खेळवण्यासाठी आज त्याला संधी मिळू शकते. दौऱ्यात असणारा वॉशिंग्टन सुदंरही आज अक्षर पटेलच्या जागी खेळू शकतो. सुंदर बरेच दिवस संधी न मिळाल्यामुळे आज त्याला संधी मिळू शकते.
श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या वनडेसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग.
भारताविरुद्धच्या शेवटच्या वनडेसाठी श्रीलंकेची संभाव्य प्लेईंग 11-
अविष्का फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, चरित असालंका, दासुन शानाका (क), वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलालेज, चमिका करुणारत्ने, कसून राजिथा, लाहिरू कुमारा.
भारत विरुद्ध श्रीलंका Head to Head
भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात आतापर्यंत तब्बल 163 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारतानं यामध्ये 94 सामने जिंकले असून श्रीलंका संघाला 57 सामने जिंकण्यात यश आलं आहे. याशिवाय दोघांमधील एकूण 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. तसंच एक सामना बरोबरीत सुटला आहे.
View this post on Instagram
हे देखील वाचा-