(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SA, 3rd Test Live: निर्णायक कसोटीत भारत पराभूत, मालिकाही गमावली
IND vs SA, Day 2 Live : मालिका 1-1 बरोबरीत आहे. निर्णायक केपटाऊन कसोटी सामना जिंकणारा संघ मालिकेवर नाव कोरणार आहे.
LIVE
Background
यIND Vs SA 4th Day Score Live : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये (Cape Town) तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना सुरु आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी मिळवली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव करत दक्षिण आफ्रिका संघाने हिशोब चुकता केला. तीन सामन्याची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवणारा संघ मालिकेवर कब्जा करेल.
सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजी घेतली. त्यानंतर सलामीवीर राहुल, मयांक आणि रहाणे स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर भारताचा अनुभवी पुजाराने 43 धावा केल्या खऱ्या पण तोही बाद झाला. त्यानंतर विराटने एका बाजूने मोर्चा सांभाळला पण त्याला कोणाची साथ न मिळाल्याने अखेर तोही 79 धावा करुन बाद झाला आणि भारताचा डाव 223 धावांवर आटोपला.ज्यानंतर सामन्यात टिकून राहण्यासाठी भारतीय गोलंदाजाना चांगली कामगिरी करणं अनिवार्य होतं. त्यानुसार बुमराहने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत आफ्रिकेचे पाच गडी बाद केले. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजानी भेदक मारा करत नऊ गडी तंबूत धाडले. यात बुमराहने 4, शमीने 2 आणि यादवने 2 तर शार्दूलने एक विकेट घेतली. आफ्रिकेकडून कीगन पीटरसनने सर्वाधिक 72 धावा केल्या. ज्यामुळे आफ्रिका 210 धावाच करु शकले. ज्यानंतर भारताने दुसऱ्या डावात पंतच्या शतकाच्या मदतीने आफ्रिकेला 212 धावांचे आव्हान दिले आहे. पण आफ्रिकेने या आव्हानाचा वेगात पाठलाग करत विजयाच्या उंबरठ्यावर खेळ पोहोचवला आणि 7 विकेट्सनी सामना जिंकला.
संघ-
भारताचा प्लेईंग इलेव्हन– केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेटकिपर), रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव
दक्षिण आफ्रिकेचा प्लेईंग इलेव्हन– डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रुसी व्हॅन डर ड्यूसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (विकेटकिपर), मार्को जानसेन, कगिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी.
दक्षिण आफ्रिका 7 विकेट्सनी विजयी
दक्षिण आफ्रिकेने अप्रतिम फलंदाजी करत 7 विकेट्सनी सामना जिंकला आहे. त्यामुळे मालिकाही त्यांनी 2-1 ने जिंकली आहे.
चौथ्या दिवशीचा लंचब्रेक, दक्षिण आफ्रिकेला 41 धावांची गरज
चौथ्या दिवशीचा लंचब्रेक झाला असून आफ्रिकेला 41 धावा तर भारताला 7 विकेट्सची गरज आहे.
आफ्रिका विजयाच्या जवळ, भारत पराभवाच्या सावटाखाली
आफ्रिकेचा संघ उत्तम फलंदाजी करत सामना आणि मालिका खिशात टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यांना विजयासाठी केवळ 41 धावांची गरज असून भारताला 7 विकेट्सची गरज आहे.