India vs South Africa : डिकॉक-पांड्या मिळवून देणार गुण, हे 11 खेळाडू तुम्हाला करु शकतात मालामाल
India vs South Africa : भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यामध्ये आजापासून पाच सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे.
India vs South Africa : भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यामध्ये आजापासून पाच सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघासाठी ही यंदाची अखेरची टी 20 मालिका आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 विश्वचषकासाठी संघ बांधणी करण्याच्या दृष्टीने ही मालिका महत्वाची आहे. टी 20 मालिका सुरु होण्याआधीच भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. कर्णधार केएल राहुल आणि फिरकीपटू केएल राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत. राहुलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर हार्दिक पांड्या उपकर्णधार असेल. आयपीएल 2022 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक यांच्याशिवाय दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. या खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये संधी मिळणार का? हे संध्याकाळी नाणेफेकीनंतरच समजणार आहे.
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा भारताला क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल. 2022 च्या सुरुवातीला घरच्या मैदानावर आफ्रिकाने भारताचा पराभव केला होता. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरणार आहे. वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाचं संघात पुनरागमन झालेय. त्याशिवा कगिसो रबाडाचा भेदक माराही असणार आहे. तसेच आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारा क्विंटन डिकॉक आणि डेविड मिलर यांच्यावर आफ्रिकेच्या फलंदाजीची भिस्त असेल.
रोहित आणि राहुलच्या अनुपस्थितीत पंतकडे भारतीय संघाचं नेतृत्व आलेय. आंतरराष्ट्रीय सामन्यात पंतला नेतृत्व करण्याचा अनुभव नाही. पण आयपीएलमध्ये दिल्ली संघाचं नेतृत्व सांभाळण्याचा अनुभव पंतच्या पाठीशी आहे. आयपीएल 2022 मध्ये दिल्ली गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर होती. तर 2021 मध्ये दिल्ली क्वालिफायर सामना खेळली होती. धोनीचा वारसा चालवण्याचा पंत नक्कीच प्रयत्न करेल. धोनीप्रमाणेच पंतही खेळाडूंना सपोर्ट करत असल्याचं म्हटलेय जातेय.
फलंदाजीत क्विंटन डिकॉक धावांचा पाऊस पाडू शकतो. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये डिकॉकने 508 धावांचा पाऊस पाडलाय. तर ईशान किशन भारताकडून सलामीला उतरणार आहे. ईशान किशन मोठी खेळी करु शकतो. त्याशिवाय श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या यांच्याकडूनही मोठ्या खेळीची आपेक्षा आहे. तर दक्षिण आफ्रिकाकडून डेविड मिलर विस्फोटक खेळी करु शकतो.
IND vs SA Dream11 Team Prediction
विकेटकीपर : क्विंटन डिकॉक (उपकर्णधार), ऋषभ पंत
फलंदाज: डेविड मिलर, श्रेयस अय्यर आणि टेम्बा बावुमा
अष्टपैलू : हार्दिक पंड्या (कर्णधार) आणि एडन मार्करम
गोलंदाज : युजवेंद्र चहल, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी आणि हर्षल पटेल
दुसरा संघ -
विकेटकीपर – क्विंटन डिकॉक, ऋषभ पंत
फलंदाज – ऋतुराज गायकवाड (C), क्षेयस अय्यर, डेविड मिलर
All-rounders – हार्दिक पांड्या, एडन मार्करम(VC)
Bowlers – यजुवेंद्र चाहल, कगिसो रबाडा, हर्षल पटेल, नॉर्त्जे