IND vs SA 2nd Test Score Live: दक्षिण आफ्रिका विजयाच्या दिशेने, दीडशे धावांचा टप्पाही पार
India vs South Africa 2nd Test Live Updates: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा तिसऱ्या दिवशीचा खेळ सध्या सुरु आहे.
LIVE
Background
India vs South Africa 2nd Test Live Updates: सरत्या वर्षांला धडाकेबाज कसोटी विजयासह निरोप दिल्यानंतर नव्या वर्षांत ऐतिहासिक शिखर सर करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. सेंच्युरिअन येथे झालेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत भारतानं 113 धावांनी दणदणीत विजय मिळवून तीन लढतींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यातून विराट कोहली बाहेर झालाय. त्याच्याऐवजी भारताचा सलामीवीर केएल राहुल भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व करत आहे. दरम्यान दुसऱ्या कसोटीत सध्या भारत आपला दुसरा डाव खेळत आहे. तिसऱ्या दिवशी रहाणे आणि पुजारा यांनी अप्रतिम अर्धशतकं झळकावल्याने भारताची स्थिती काहीशी सुधारली आहे.
आतापर्यंत कसोटी
आतापर्यंत सामन्यात पहिल्यादिवशी भारताने पहिल्या डावात 202 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने फलंदाजीला सुरुवात केली असता पहिल्या दिवशीच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका संघाने 1 विकेट गमावत 35 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर शार्दूलने आफ्रिकेचे तीन गडी पटापट बाद केले. पण त्यानंतर बावुमा आणि काईल या जोडीने डाव सावरला आणि धावसंख्या 160 च्या पुढे पोहोचवली. पण 162 धावांवर काईल बाद होताच 177 धावांवर बावुमाही बाद झाला. नंतर लगेचच शमीने रबाडालाही तंबूत धाडलं. ज्यानंतर मार्को आणि महाराज यांनी आठव्या गड्यासाठी काही धावा केल्या पण महाराजला बुमराहने (Jasprit Bumrah) बाद करताच शार्दूलने अखेरचे दोन गडी बाद करत आफ्रिकेला 229 धावांत सर्वबाद केलं. त्यानंतर भारत दुसरा डाव खेळत आहे.
संघ:
दक्षिण आफ्रिकेचा संघ: डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर डुसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी.
भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
दिवसअखेर दक्षिण आफ्रिका 118 वर दोन बाद
तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला असून दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने 118 धावा केल्या असून केवळ 2 विकेट गमावले आहेत. आफ्रिकेला विजयासाठी 122 धावांची गरज आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या 100 झावा पूर्ण, केवळ दोन गडी बाद
शार्दूलने पहिली विकेट घेतल्यानंतर आश्विनने दुसरा गडी बाद केला आहे. पण दक्षिण आफ्रिकेच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत.
लॉर्ड शार्दुलने भारताला मिळवून दिलं पहिलं यश
शार्दूल ठाकूरने भारताला पहिलं यश मिळवून दिलेय. मार्करनला 31 धावांवर पाठवलं तंबूत. दक्षिण आफ्रिका एक बाद 47 धावा.
तिसऱ्या दिवशीचा चहापानाचा ब्रेक, दक्षिण आफ्रिका 34/0
दक्षिण आफ्रिका आपला दुसरा डाव खेळत असून त्यांना विजयासाठी 240 धावांची गरज आहे. सध्या त्यांनी 34 धावा केल्या असून एकही विकेट गमावलेली नाही.
भारतीय संघाकडे 239 धावांची आघाडी
भारतीय संघाचा दुसरा266 धावांवर संपुष्टात आला आहे. रहाणे आणि पुजाराच्या अर्धशतकानंतर तळाला विहारी आणि शार्दुल ठाकूर यांनी महत्वाच्या धावा काढल्या. भारताकडून अजिंक्य रहाणे याने 58 तर पुजाराने 53 धावंची खेळी केली. या दोघांमध्ये 111 धावांची भागिदारी झाली. विहारीने तळाच्या फलंदाजांना घेत धावसंख्या वाढवली. भारतीय संघाकडे 239 धावांची आघाडी आहे. सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाला 240 धावांची गरज आहे.