एक्स्प्लोर

IND vs SCO: टीम इंडिया उद्या स्कॉटलंडशी भिडणार; विजयाची मोहीम सुरू ठेवण्यासाठी विराट सेना सज्ज

India vs Scotland: टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सामना आता स्कॉटलंडशी होणार आहे. उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी विराट सेनेला हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल.

India vs Scotland: 2021 च्या T20 विश्वचषकात उद्या भारत आणि स्कॉटलंड आमनेसामने येणार आहेत. हा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता आणि इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून असल्याने 'जर तर' मध्ये अडकलेली टीम इंडिया शुक्रवारी स्कॉटलंडविरुद्ध टी-20 विश्वचषकात आणखी एका 'करो किंवा मरो' सामन्यात मोठा विजय नोंदवण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल.

अफगाणिस्तानवर 66 धावांनी दणदणीत विजय मिळविल्यानंतर विराट सेनेच्या नजरा ही गती कायम ठेवण्यावर असेल. या सामन्यात भारताला केवळ विजयाची नोंद करावी लागणार नाही तर नेट रन रेट सुधारण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल आणि इतर संघांचे निकाल अनुकूल असतील अशी अपेक्षा आहे.

पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे भारताचा रन रेट खूप घसरला होता. आता भारतासाठी प्रत्येक सामना करा किंवा मरा असा आहे. पाकिस्तानने सलग चार विजयांसह उपांत्य फेरी गाठली असून न्यूझीलंडही गट 2 मधून पात्र होण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. तसे, न्यूझीलंड नामिबिया किंवा अफगाणिस्तानकडून हरले तर भारताच्या आशा पल्लवित होऊ शकतात. मात्र, भारतीय संघ आपल्या हातात काय आहे यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. अशा परिस्थितीत विराट कोहली आणि संघाच्या नजरा स्कॉटलंडला मोठ्या फरकाने पराभूत करण्यावर आहेत.

पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध अपयशी ठरलेल्या भारताच्या दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजांनी अफगाणिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केली. तिसऱ्या क्रमांकावर उतरण्याच्या वादग्रस्त निर्णयानंतर रोहित शर्माला पुन्हा सलामीला पाठवण्यात आले. त्यानेही शानदार अर्धशतक झळकावून आपला फॉर्म दाखवला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये काही निर्णय चुकीचे ठरल्याचे रोहितने सामन्यानंतर मान्य केले. रोहित, केएल राहुल, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी अफगाणिस्तानविरुद्ध चांगल्या धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर संघात परतलेल्या सूर्यकुमार यादवच्या आगमनाने फलंदाजी मजबूत झाली आहे. त्याच्याशिवाय खालच्या फळीत रवींद्र जडेजाही उपयुक्त ठरतो. 

गोलंदाजीत चार वर्षांनंतर टी-20 सामना खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनने चार षटकांत 14 धावा देत दोन बळी घेतले. त्याला बाहेर ठेवण्याच्या निर्णयावर टीका झाल्यानंतर अखेर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली म्हणाला की, अश्विनचे ​​पुनरागमन खूप सकारात्मक होते. यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. हे नियंत्रण आणि लय त्याने आयपीएलमध्येही दाखवून दिली. तो हुशार असण्यासोबतच विकेट घेणाराही आहे.

फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या दुखापतीमुळे अश्विनला संधी देण्यात आली. वास्तविक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दबावाचा सामना करण्यात चक्रवर्ती अपयशी ठरला आणि आता त्याला पुढे खेळणे शक्य नाही. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनीही चांगली गोलंदाजी केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 22 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSanjay Raut Mumbai : त्या सर्व्हेची ऐसी की तैसी, 160 जागा आम्ही जिंकणारच! राऊतांचा हल्लाबोल#abpमाझाRajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
Embed widget