Commonwealth Games 2022: भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) झुंजार अर्धशतकाच्या (42 चेंडूत 63 धावा) जोरावर भारतानं पाकिस्तानचा 9 विकेट्सनं (India Beats Pakisthan) पराभव केलाय. या पराभवसह पाकिस्तानचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या संघानं गुडघे टेकले. पावसामुळं या सामन्यातील दोन षटक कमी करण्यात आले. पाकिस्तानला 18 षटकात 99 धावापर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात भारतानं 11.4 षटकात आणि 8 विकेट्स राखून पाकिस्ताननं दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं


पाकिस्तानच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय महिलांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. सलामीवीर स्मृती मानधना (नाबाद 63) आणि शेफाली वर्मानं (16 धावा) सुरुवातीपासून आक्रमक खेळी केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागेदारी झाली. त्यानंतर सहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर शेफाली आऊट झाली. मात्र, स्मृतीनं दुसऱ्या बाजूनं आक्रमक खेळी सुरुच ठेवली आणि भारतानं हा सामना जिंकला. पाकिस्तानकडून तुबा हसन आणि ओमैमा सोहेल यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.


भारतानं पाकिस्तानच्या संघाला 99 धावांवर रोखलं
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या पाकिस्तानचा संपूर्ण संघ 99 धावांवर बाद झाला. पाकिस्तानकडून सलामीवीर मुनिबा अलीनं 32 धावा केल्या. तर, भारताकडून राधा यादव आणि स्नेह राणानं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. या सामन्यात पाकिस्तानचे तीन खेळाडू रन आऊट झाले. पाकिस्ताननं 18 षटकात 10 विकेट्स गमावून भारतासमोर 100 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताकडून स्नेह राणा, राधा यादव यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर, रेणुका सिंह आणि मेघना सिंह यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली.


हे देखील वाचा-