IND vs PAK, CWG 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत (Birmingham Commonwealth Games 2022) पाकिस्ताननं (Pakistan Women) नाणेफेक जिंकून भारतीय संघाला (India Women) प्रथम गोलंदाजीचं आमंत्रण दिलंय. दोन्ही संघाला आपपल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. यामुळं आजचा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघाचं स्पर्धेतील आव्हान जिंवत राहील. तर, पराभूत झालेल्या संघाला स्पर्धेतून बाहेर पडावं लागणार आहे.


कॉमनवेल्थ स्पर्धेत भारत- पाकिस्तानची खराब सुरुवात
बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामारे जावं लागलं. तर, दुसरीकडं बार्बाडोसकडून पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाने काही महिन्यांपूर्वी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानला पराभूत केलं होतं. 


भारत- पाकिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 11 टी-20 सामने खेळण्यात आले आहेत. यातील 9 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, उर्वरित तीन भारताला पराभव पत्कारावा लागलाय. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाचा पाकिस्तानवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असेल.


भारतीय संघ:
स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, सभिनेनी मेघना, दीप्ती शर्मा, राधा यादव, स्नेह राणा, मेघना सिंग, रेणुका सिंह.


पाकिस्तानचा संघ:
इरम जावेद, मुनीबा अली (विकेटकिपर), ओमामा सोहेल, बिस्माह मारूफ (कर्णधार), आलिया रियाझ, आयेशा नसीम, ​​कैनत इम्तियाज, फातिमा सना, तुबा हसन, डायना बेग, अनम अमीन


हे देखील वाचा-