IND vs PAK, CWG 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ (Commonwealth Games Womens) स्पर्धेतील करो या मरोच्या सामन्यात भारतीय गोलंदाजाचा भेदक मारा आणि उत्कृष्ट अशा क्षेत्ररक्षणासमोर पाकिस्तानच्या (India vs Pakistan) फलंदाजांनी गुडघे टेकले. या सामन्यात पाकिस्तानच्या संघानं प्रथम फलंदाजी करत 18 षटकात सर्वबाद 99 धावा केल्या. पावसामुळं 20 षटकाच्या सामन्यातील दोन षटक कमी करण्यात आली. हा सामना जिंकण्यासाठी भारताला 100 धावा कराव्या लागतील. या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाचं कॉमनवेल्थ स्पर्धेतील आव्हान जिवंत राहील. तर, पराभूत होणाऱ्या संघाला स्पर्धेतून बाहेर पडावं लागणार आहे. यामुळं या सामन्यात विजय मिळवण्यासाठी पाकिस्तानचा संघही जोर लावताना दिसेल.


भारतानं पाकिस्तानच्या संघाला 99 धावांवर रोखलं
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या पाकिस्तानचा संपूर्ण संघ 99 धावांवर बाद झाला. पाकिस्तानकडून सलामीवीर मुनिबा अलीनं 32 धावा केल्या. तर, भारताकडून राधा यादव आणि स्नेह राणानं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. या सामन्यात पाकिस्तानचे तीन खेळाडू रन आऊट झाले. भारताला विजयासाठी 18 षटकात पूर्ण 100 धावांची गरज आहे.


भारत आणि पाकिस्तानला आपपल्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. सलामीच्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून 3 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. तर पाकिस्तानला बार्बाडोसकडून 15 धावांनी पराभव पत्कारावा लागला. या सामन्यात विजय मिळवून दोन्ही संघाचं गुणतालिकेत खात उघडण्यावर लक्ष असेल.


भारतीय संघ:
स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, सभिनेनी मेघना, दीप्ती शर्मा, राधा यादव, स्नेह राणा, मेघना सिंग, रेणुका सिंह.


पाकिस्तानचा संघ:
इरम जावेद, मुनीबा अली (विकेटकिपर), ओमामा सोहेल, बिस्माह मारूफ (कर्णधार), आलिया रियाझ, आयेशा नसीम, ​​कैनत इम्तियाज, फातिमा सना, तुबा हसन, डायना बेग, अनम अमीन.


हे देखील वाचा-