India vs New Zealand ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना काही मिनिटांत सुरु होत आहे. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर सुरु होणाऱ्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.


भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs NZ ODI Series) तगडा विजय मिळवत मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ज्यानंतर भारत आजचा सामना जिंकून न्यूझीलंडला व्हाईट वॉश देऊ शकतो. तर न्यूझीलंड अखेरचा सामना जिंकून किमान मालिकेचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यात मागील काही सामने भारत प्रथम फलंदाजी करुन मोठी धावसंख्या उभारताना दिसला. आजही भारत अशीच कामगिरी करणार की ज्याप्रमाणे दुसऱ्या वन-डेमध्ये न्यूझीलंड (India vs New Zealand) स्वस्तात सर्वबाद झाला तशीच वेळ भारतावर येणार हे पाहावे लागेल. दरम्यान भारताने दोन बदल केले असून सिराज आणि शमी यांना विश्रांती देत चहल आणि उमरानला संधी दिली आहे. न्यूझीलंडनेही जॅकॉब डफीला हेन्री शिपलेच्या जागी संधी दिली आहे.


कसे आहेत दोन्ही संघ?


भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, युजवेंद्र चहल


न्यूझीलंड - फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सॅंटनर, जॅकॉब डफी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर


प्रथम गोलंदाजी करणाऱ्यांचा रेकॉर्ड चांगला


इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमची (Holkar Cricket Stadium, Indore) खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप उपयुक्त आहे. याशिवाय येथील चौकारही लहान असल्याने फलंदाजांना खूप मदत मिळते. वेगवान गोलंदाजांना देखील काही प्रमाणात मदत मिळते. मात्र धावा वाचवण्यासाठी गोलंदाजांना कमालीची कसरत करावी लागणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या एकूण पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये, नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने 3 वेळा विजय मिळवला आहे, तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दोनदा विजय मिळवला आहे. त्यामुळे एकंदरीत नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करणे फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे.


हे देखील वाचा-