IND vs NZ, 2nd ODI : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand)यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना आज होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर (Holkar Cricket Stadium) होणार आहे. तिसरा सामना जिंकून न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्याचं लक्ष्य रोहित शर्मा अँड कंपनीचं असणार असून न्यूझीलंड हा अखेरचा सामना जिंकून मालिकेचजा शेवट गोड करु इच्छित असणार आहे.  हैदराबाद आणि रायपूरमध्ये झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाने याआधीच विजय मिळवला आहे. अशा स्थितीत भारताकडे 2-0 अशी विजयी आघाडी आहे. न्यूझीलंडचा संघ इंदूरमध्ये प्रथमच एकदिवसीय सामना खेळणार आहे. त्याचवेळी, होळकर स्टेडियमवर भारताचा एकदिवसीय विक्रम जबरदस्त आहे. तर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासाठी दमदार कामगिरी करु शकतात असे खेळाडू कोण आहेत ते जाणून घेऊ...


विराट कोहली


भारताचा माजी कर्णधार विराट कोहली तिसऱ्या सामन्यात भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. सध्या तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या एका महिन्यात त्याने वनडेत तीन शतकं झळकावली आहेत. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याला आतापर्यंत विशेष काही करता आलेले नाही. विराटला पहिल्या सामन्यात केवळ 8 धावा आणि दुसऱ्या सामन्यात 11 धावा करता आल्या. तिसऱ्या सामन्यात कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.


शुभमन गिल


न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात द्विशतक झळकावणारा शुभमन गिल सध्या चर्चेत आहे. गेल्या काही काळापासून त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी उत्कृष्ट आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण करणारा तो भारताचा पहिला फलंदाज आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 208 धावा करणाऱ्या शुभमनने दुसऱ्या सामन्यात नाबाद 40 धावांची खेळी केली. तिसऱ्या सामन्यातही तो चांगली कामगिरी करण्याची दाट शक्यता आहे.


रोहित शर्मा


टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध चांगली फलंदाजी केली आहे. किवीजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 34 धावा करणाऱ्या रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात 51 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यातही हिटमॅनला पुन्हा एकदा कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळायला आवडेल.


इंदूरमधील या सामन्यापूर्वी भारताच्या याठिकाणच्या काही मोठ्या वनडे रेकॉर्डबद्दल जाणून घेऊ... 



  1. सर्वोच्च धावसंख्या - भारत 418/5 वि. वेस्ट इंडीज

  2. वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या - वीरेंद्र सेहवाग, वि. वेस्ट इंडिज 

  3. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी - एस श्रीशांत, 6 विकेट्स वि. इंग्लंड 


हे देखील वाचा-