India vs New Zealand, 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना आज खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना आज दुपारी खेळवला जाणार आहे. मालिकेतील हा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान आजचा सामना भारताला जिंकून न्यूझीलंडला व्हाईट वॉश देता येईल तर न्यूझीलंडला सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करता येईल. यामुळे आजच्या महत्त्वाच्या सामन्यात मैदानाची खेळपट्टी (Pitch Report) कशी आहे अर्थात पिच रिपोर्ट जाणून घेऊ... 


सामना होणाऱ्या इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त आहे. याशिवाय येथील लहान चौकार फलंदाजांना खूप मदत करतात. वेगवान गोलंदाजांना देखील काही प्रमाणात मदत मिळते. मात्र धावा वाचवण्यासाठी गोलंदाजांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.  आतापर्यंत खेळलेल्या एकूण पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये, नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने 3 वेळा विजय मिळवला आहे, तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दोनदा विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करणे फायदेशीर असल्याने टॉस जिंकणारा संघ बोलिंग घेऊ शकतो. 


दमदार आहे भारताचा इंदूरमधील रेकॉर्ड


इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये भारताचाच दबदबा आजवर राहिला आहे. वनडेमध्ये भारतीय संघ आतापर्यंत एकही सामना हरलेला आहे. भारताने इंदूरमध्ये 5 पाच एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये भारताने विजयाची नोंद केली आहे. इंदूर येथे पहिला एकदिवसीय सामना 15 एप्रिल 2006 रोजी खेळला गेला. त्यात भारताने इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला. त्यानंतर पुढील चार सामन्यांत सलग विजय नोंदवण्यात टीम इंडियाला यश आलं आहे. या मैदानावर भारताने आतापर्यंत इंग्लंडला दोनदा तर वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना प्रत्येकी एकदा पराभूत केलं आहे. न्यूझीलंडचा संघ इंदूरमध्ये प्रथमच एकदिवसीय सामना खेळणार आहे.


हे देखील वाचा-