IND vs NZ 3rd ODI Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) न्यूझीलंड संघाविरुद्ध एकदिवसीय मालिका (IND vs NZ ODI Series) खेळत असून आज मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जाणार आहे. आज भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. भारताने मालिकेतील पहिले दोन्ही सामने अगदी दमदार पद्धतीनं जिंकत मालिकेत वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. आता तिसरा सामना जिंकून भारत न्यूझीलंडला व्हाईट वॉश देऊ शकतो. या मालिकेआधी भारताने श्रीलंका संघाला व्हाईट वॉश दिला. आता पुन्हा भारत हीच कामगिरी करतो का? हे पाहावं लागेल. तर आजच्या या सामन्याची माहिती जाणून घेऊ...

Continues below advertisement

कधी होणार सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड हा तिसरा एकदिवसीय (India vs New Zealand 3rd ODI) आज अर्थात 24 जानेवारी रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. 

Continues below advertisement

कुठे आहे सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर (Holkar Cricket Stadium) खेळवला जाणार आहे.  

कुठे पाहता येणार सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

भारताचा एकदिवसीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार)वॉशिंगट सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराद, उमरान मलिक 

न्यूझीलंडचा एकदिवसीय संघ:

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकिपर/कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन, हेन्री शिपले

भारत विरुद्ध न्यूझीलंड Head to Head

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 115 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 57 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत. याशिवाय 7 सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही आणि एक सामना बरोबरीत सुटला.  

हे देखील वाचा-