India vs New Zealand 2nd T20: रांचीमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलँडने भारतासमोर विजयासाठी 154 धावांचे आव्हान ठेवले आहे. मार्टिन गप्टिल आणि डेरेल मिशेलने न्यूझीलँडला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करत किवींना मोठी धावसंख्या उभी करण्यापासून रोखले. टीम इंडियाचा गोलंदाज हर्षल पटेलने पदापर्णाच्या सामन्यात प्रभावी मारा करत 25 धावांत दोन गडी बाद केले. 


प्रथम फलंदाजीस उतरलेल्या न्यूझीलँडच्या मार्टिन गप्टिल आणि डॅरेल मिशेल यांनी संघाला झंझावाती सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४.२ षटकांत ४८ धावा जोडल्या. गप्टिल तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 31 धावा काढून बाद झाला. तर मिचेलने 28 चेंडूत 31 धावा केल्या.


पॉवर प्लेमध्ये न्यूझीलंडची धावसंख्या ६० च्या पुढे होती. किवींनी 9 षटकांत 80 धावा केल्या होत्या. मात्र, भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत ठराविक अंतराने विकेट्स घेतल्या. यादरम्यान मार्क चॅपमन 21, ग्लेन फिलिप्स 34, टिम सेफर्ट 13 आणि जेम्स नीसन 03 धावा करून बाद झाले.


न्यूझीलँडच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. टीम इंडियात पदार्पण करणाऱ्या हर्षल पटेलने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत 25 धावा देत दोन बळी घेतले. त्याशिवाय, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. 


हेड टू हेड


टी20 इंटरनॅशनल सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा संघ टीम इंडियावर वरचढ ठरला आहे. दोन्ही संघांनी आमनेसामने 18 सामने खेळले आहेत. त्यापैकी 9 सामने न्यूझीलंडनं जिंकले आहेत तर भारताने सात सामने जिंकले आहेत.  


 


पाच वर्षात टीम इंडियानं जिंकल्या आहेत 10 मालिका 


2016 सालापासून भारतीय संघानं आपल्या भूमीत मागील 11 टी20 इंटरनॅशनल मालिकेतील 10 मालिका जिंकल्या आहेत. सोबतच मागील सलग चार मालिका टीम इंडियानं जिंकल्या आहेत.  









इतर महत्त्वाच्या बातम्या:


अॅशेस मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला धक्का; टिम पेनने सोडले कर्णधारपद, 'Sexting'प्रकरण भोवले


AB de Villiers Retirement : मिस्टर 360 डिग्री... साऊथ आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्सची निवृत्तीची घोषणा


टी-20 विश्वचषकात मैदान गाजवणारा मॅथ्यू वेड क्रिकेटला करणार अलविदा; 'या' स्पर्धेनंतर घेणार संन्यास


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha