IND vs IRE 1st T20 Playing 11 : भारतीय संघ आज आयर्लंड विरुद्द पहिला टी20 सामना खेळणार असून बऱ्याच काळानंतर भारत आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. दरम्यान भारताचा मुख्य संघ इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांचा सराव करत असून हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली युवा खेळाडूंची फौज आयर्लंडविरुद्ध सामना खेळेल. त्यामुळे एकप्रकारे भारताच्या बी संघाशी आयर्लंड सामना खेळणार असून याबद्दल बोलताना आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बालबर्नी (Andrew Balbirnie) याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अँड्र्यू याने सामन्याआधीच्या प्रेसमध्ये बोलताना सांगतिले, ''सध्या भारताचा जो देखील संघ मैदानात उतरतो, तो चांगला खेळ करणाराच आहे. यातून कळून येतं की भारतीय संघात किती दमदार खेळाडू आहेत. ते एकावेळी दोन शानदार खेळी करणारे संघ भारत मैदानात उतरवू शकतो. त्यामुळे आम्हीही भारताविरुद्ध खेळण्यासाठी उत्सुक आहोत.''
अशी असू शकते संभावित प्लेईंग 11 - ईशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक, राहुल त्रिपाठी, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.
असा आहे आयर्लंडचा संघ
अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), मार्क अडायर, कर्टिस कॅपर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, जोश लिटिल, अँड्र्यू मॅकब्राईन, बॅरी मॅकार्थी, कॉनर ऑफ्लर्ट, पॉल स्टलिंर्ग, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, क्रेग यंग.
भारत विरुद्ध आयर्लंड
भारत आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत 3 टी-20 सामने खेळवले गेले आहे. या सर्व सामन्यात अपेक्षेप्रमाणे भारताचचं पारडं जड दिसून आलं आहे. कारण तीन पैकी तिनही सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, आयर्लंड संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे आता या दोन सामन्यांपैकी आजचा सामना जिंकून भारत आपला विजयी रथ कायम ठेवायचा प्रयत्न करेल. तर आयर्लंड सामन्यात विजय मिळवून भारताविरुद्ध पहिला-वहिला विजय मिळवू इच्छित असेल.
हे देखील वाचा-