SL vs IND: तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघानं श्रीलंकेचा पाच विकेट्सनं पराभव केला. या विजयासह भारतीय संघान टी-20 मालिकेवर 2-0 नं कब्जा केलाय. या मालिकेतील तिसरा सामना केवळ औपचारिकता म्हणून खेळला जाईल. दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रीलंकेच्या संघानं 20 षटकात सात विकेट्स गमावून भारतासमोर 126 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं पाच विकेट्स राखून हा सामना जिंकला.


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर विष्मी गुणरत्ने (45 धावा, 50 चेंडू) आणि कर्णधार चामिरी अथापट्टू (43 धावा, 41 चेंडू) यांच्यात पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागेदारी झाली. दरम्यान, चौदाव्या षटकात हरमनप्रीत कौरनं श्रीलंकेच्या कर्णधाराला बाद केलं.


त्यानंतर सतराव्या षटकात विष्मी गुणरत्नेच्या रुपात पूजा वस्त्राकरनं श्रीलंकेच्या संघाल मोठा धक्का दिली. अथापट्टू आणि गुणरत्ने बाद झाल्यानंतर श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला 10 धावांचा आकडा गाठता आला नाही. श्रीलंकेच्या संघानं सात विकेट्स गमावून भारतासमोर 126 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताकडून दीप्ती शर्मानं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, रेणुका सिंह, राधा यादव, पूजा वस्त्राकर आणि हरमनप्रीत कौरनं प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली.


श्रीलंकेच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताचे सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मानं संघाला चांगली सुरुवात करून दिली. भारताच्या डावातील पाचव्या षटकात शेफाली वर्मा बाद झाली. त्यानंतर एस मेघनाही स्वस्तात माघारी परतली.


या सामन्यात स्मृती मानधान मोठी धावसंख्या उभारेल, अशी अपेक्षा केली जात असताना तिच्या वयैक्तिक 17 धावांवर आऊट झाला. अखेर कर्णधार हरमनप्रीत सिंह (31 धावा) संयमी फलंदाजीच्या जोरावर भारतानं पाच विकेट्स राखून सामना जिंकला. श्रीलंकेकडून इनोका रणवीरा आणि ओ रणसिंगेनं यांनी प्रत्येकी दोन- दोन विकेट्स घेतल्या. तर, एस कुमारीला एक विकेट मिळाली. 


हे देखील वाचा-