Rohit Sharma Covid19 Positive : भारतीय संघ (Team India) सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये (IND Vs ENG) एक कसोटी सामना, तीन वनडे आणि तीन टी 20 सामने खेळवले जाणार आहेत. कसोटी सामना 1 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. मात्र याआधी टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला कोरोनाची (Corona Positive) लागण झाली आहे. शनिवारी त्यांच्या रॅपिड अँटीजेन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रोहित शर्मा सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. बीबीसीसीआयने (BCCI) ट्विट करत याची माहिती दिली आहे. रोहित शर्मा सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. त्यामुळे आता रोहित शर्माच्या गैरहजेरीत संघाची धुरा कोण सांभाळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.


'हा' खेळाडू बनू शकतो कर्णधार
बीसीसीआयने (BCCI) मागील कसोटीसाठी उपकर्णधाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या जागी नवीन खेळाडूकडे पाचव्या आणि शेवटच्या कसोटीची कमान सोपवली जाऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, रोहितच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत कसोटीचा कर्णधार बनण्याची शक्यता आहे. अलीकडेच ऋषभने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेची जबाबदारी स्वीकारली. दरम्यान विराट कोहलीला कर्णधारपद सोपवणार असल्याचीही चर्चा आहे.


बीसीसीआयचं ट्विट 
बीबीसीसीआयने (BCCI) ट्विट करत सांगितलं आहे की, 'भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या रोहित टीम इंडियाच्या हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये आहे. रविवारी रोहितची आरटी-पीसीआर टेस्ट केली जाईल.'






महत्त्वाच्या इतर बातम्या