India vs England | ...तर विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा, इंग्लंडच्या माँटी पनेसरचा सल्ला
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने सलग चार कसोटी सामने गमावले आहेत. मंगळवारी चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध भारताला 227 धावांनी पराभव पत्करावा लागला
INDvsENG : इंग्लंडविरुद्धच्या चेन्नईतील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आता विराट कोहलीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. इंग्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या दुसरी कसोटीतही भारताचा पराभव झाल्यास विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा, असं इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पनेसर यांने म्हटलं आहे. कोहलीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने सलग चार कसोटी सामने गमावले आहेत. मंगळवारी चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध भारताला 227 धावांनी पराभव पत्करावा लागला आणि त्याआधी एडिलेड, क्राइस्टचर्च आणि वेलिंग्टन येथेही कोहलीच्या नेतृत्वात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
पनेसर पुढे म्हणाला की, विराट कोहली हा आतापर्यंतचा महान फलंदाज आहे. पण त्याच्या नेतृत्वात टीम आता चांगली कामगिरी करत नाहीये. तसेच कोहलीच्या नेतृत्वात भारताच्या अखेरच्या चार कसोटी सामन्यांचे निकालही निराशाजनक आहेत. त्यामुळे मला वाटते कोहली अधिक दबावात असेल. कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेने चमकदार कामगिरी केल्यामुळे आता आणखी दबाव निर्माण झाला आहे.
इंग्लंडने पहिली कसोटी जिंकली आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडविरुद्ध पराभव होण्याआधी, टीम इंडियाने भारतात मागील 14 कसोटी सामन्यांत विजय मिळवला होता.
विराट कोहलीला मिळणार खास व्यक्तीची साथ, संघाच्या कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष
विराटच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने आधीच चार सामने गमाले आहेत. पुढच्या सामन्यात ही संख्या पाचपर्यंत वाढली तर मला वाटते की कोहलीने स्वत:हून आपल्या पदावरून पायउतार व्हावं." 2012-13 मध्ये इंग्लंडच्या भारत दौर्यावर पनेसरने 17 विकेट घेतल्या होत्या. पनेसरचं त्या ऐतिहासिक मालिकेच्या विजयात मोलाचे योगदान होतं. त्यामुळे फिरकीपटू कुलदीप यादवच्या जागी शाहबाज नदीमला संघात स्थान देण्याच्या संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावरही माँटी पनेसर जोरदार टीका केली.
गेल्या वर्षी कोहलीच्या नेतृत्वात भारत न्यूझीलंड दौर्यावर गेला होता. तेथे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला 0-2 असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अॅडलेड येथे खेळलेल्या पहिल्या डे-नाईट टेस्टमध्ये भारत आठ विकेट्सने पराभूत झाला होता. त्यानंतर कोहली मायदेशी परतला आणि अजिंक्य रहाणेने त्याच्या अनुपस्थितीत संघाची कमान हाती घेतली. ऑस्ट्रेलिया दौर्यादरम्यान रहाणेने तीन कसोटी सामन्यांचे नेतृत्व केले, त्यामध्ये भारताने मेलबर्न कसोटी जिंकली, तर सिडनी कसोटी अनिर्णित राहिली. यानंतर ब्रिस्बेन येथे खेळलेला अंतिम आणि चौथा सामना भारताने जिंकला आणि ऑस्ट्रेलियाला 2-1 असं पराभूत केले. इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोहली संघात परतला आणि त्याच्या नेतृत्वात भारताला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे कोहलीच्या कर्णधार पदाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.