Ind Vs Eng 3rd Test Live Update : तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय
भारत आणि इंग्लंड संघांमधल्या तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर सुरुवात होत आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतली ही कसोटी दिवसरात्र खेळवण्यात येत आहे.
LIVE
Background
IND v ENG 3rd Test Match : भारत आणि इंग्लंड संघांमधल्या तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर सुरुवात होत आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतली ही कसोटी दिवसरात्र खेळवण्यात येत आहे. या स्टेडिअमचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. गृहमंत्री अमित शाह आणि बीसीसीआयचे अनेक अधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहे.
भारतानं चेन्नईची दुसरी कसोटी जिंकून या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा अहमदाबादमध्ये कारकिर्दीतल्या कसोटी सामन्यांचं शतक साजरं करणार आहे. भारत-इंग्लंड संघांमधली तिसरी कसोटी ही त्याच्या कारकीर्दीतली शंभरावी कसोटी आहे. भारताच्या वेगवान गोलंदाजांमध्ये कपिलदेव सर्वाधिक 131 कसोटी सामन्यांमध्ये खेळला असून, त्याखालोखाल ईशांतच्या नावावर 99 कसोटी आहेत.
भारत आणि इंग्लंड संघांमधल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या निमित्तानं अहमदाबादच्या मोटेराचे स्टेडियममध्ये पहिलावहिला आंतररराष्ट्रीय सामना खेळवण्यात येईल. या स्टेडियमची प्रेक्षकक्षमता एक लाख दहा हजार असून, कोरोनामुळं तिसऱ्या कसोटीसाठी 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियम 700 कोटींहून अधिक खर्च करुन बांधले आहे. यामध्ये 1,10,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड स्टेडियम तयार करणार्या कंपनीने हे स्टेडियम डिझाइन केले आहे. यात 76 कॉर्पोरेट बॉक्स, चार ड्रेसिंग रूम आणि तीन सराव मैदाने आहेत. स्टेडियम व्यतिरिक्त, इनडोअर क्रिकेट अॅकाडमी व्यतिरिक्त जलतरण तलाव, स्क्वॅश आणि टेबल टेनिसची सुविधा आहे.
मोटेराचे स्टेडियम नव्यानेच तयार केले आहे. आतापर्यंत येथे फक्त काही टी -20 सामने खेळले गेले आहेत. गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टी 20 सामन्यात फक्त 40 षटकांचा खेळ होतो आणि त्यानुसार खेळपट्टी कशी आहे याचा अंदाज लावणे कठीण असते.