Ind vs Eng 2nd ODI : रोहित शर्माच्या वादळात ब्रिटिशांची दाणादाण! कटकमध्ये भारताने इंग्लंडचा 4 विकेट्सनी केला पराभव

India vs England 2nd ODI Live Update : भारत आणि इंग्लंड यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे.

किरण महानवर Last Updated: 09 Feb 2025 09:56 PM
Ind vs Eng 2nd ODI : भारताने दुसरा एकदिवसीय सामना चार विकेट्सने जिंकला

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा चार विकेट्सने पराभव करत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडने बेन डकेट आणि जो रूट यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 49.5 षटकांत 10 गडी गमावून 304 धावा केल्या. प्रत्युत्तरात, रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने 44.3 षटकांत सहा गडी गमावून 308 धावा केल्या आणि सामना जिंकला. दोन्ही संघांमधील तिसरा सामना 12 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाईल. 


लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली, जी जेमी ओव्हरटनने मोडली. त्याने 17 व्या षटकात गिलला आऊट केले. त्याने 52 चेंडूत 60 धावा काढल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. गिलने 45 चेंडूत त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 15 वे अर्धशतक पूर्ण केले.


तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला विराट कोहली पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बाद झाला. आदिल रशीदने त्याला आपला बळी बनवले. तो फक्त पाच धावा करू शकला. यानंतर श्रेयस अय्यरने पदभार स्वीकारला. त्याने तिसऱ्या विकेटसाठी हिटमनसोबत 70 चेंडूंची भागीदारी केली. यादरम्यान, भारतीय कर्णधाराने 76 चेंडूत त्याचे 32 वे शतक पूर्ण केले. तो 90 चेंडूत 12 चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 119 धावांची शानदार खेळी खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. डावाच्या 30 व्या षटकात लियाम लिव्हिंगस्टोनच्या चेंडूवर आदिल रशीदने त्याला झेलबाद केले.

Ind vs Eng 2nd ODI : श्रेयस अय्यर ४४ धावा करून झाला आऊट...

श्रेयस अय्यरच्या रूपाने भारताला चौथा धक्का बसला आहे.  केएल राहुल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

Ind vs Eng 2nd ODI : कटकमध्ये वादळ थंडावले! रोहित शर्मा परतला पव्हेलियनमध्ये, किती धावांची खेळी खेळली?

भारतीय कर्णधार रोहित शर्माने 90 चेंडूत 12 चौकार आणि सात षटकारांसह 119 धावांची शानदार खेळी करत पॅव्हेलियनमध्ये परतला. डावाच्या 30 व्या षटकात लियाम लिव्हिंगस्टोनच्या चेंडूवर आदिल रशीदने त्याला झेलबाद केले. आता अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी श्रेयस अय्यर क्रीजवर उपस्थित आहे. 30 षटकांनंतर भारताचा स्कोअर 220/3 आहे.

Ind vs Eng 2nd ODI : रोहित शर्माने 76 चेंडूत ठोकले शतक... कटकमध्ये दाखवलेले रौध रूप

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्माने शानदार पुनरागमन केले आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने फक्त 76 चेंडूत त्याचे 32 वे शतक पूर्ण केले. याआधी तो खराब फॉर्ममध्ये दिसला होता. 13 एकदिवसीय डावांनंतर शतक ठोकून हिटमनने टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.

Ind vs Eng 2nd ODI : भारताला दुसरा धक्का! विराट कोहली 5 धावा करून आऊट

विराट कोहलीच्या रूपाने भारतीय संघाला दुसरा धक्का बसला आहे. त्याला आदिल रशीदने आऊट केले. कोहलीने पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू मारण्याचा प्रयत्न केला आणि विकेटकीपर फिल सॉल्टने त्याला झेलबाद केले. श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.  20 षटकांनंतर भारताचा स्कोअर 151/2 आहे.

Ind vs Eng 2nd ODI : शुभमन गिल 60 धावा काढून झाला आऊट

भारताला पहिला धक्का जेमी ओव्हरटनने दिला. त्याने शुभमन गिलला आऊट केले. 52 चेंडूत 60 धावांची शानदार खेळी खेळून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने नऊ चौकार आणि एक षटकार मारला. पहिल्या विकेटसाठी गिल आणि रोहितमध्ये 136 धावांची भागीदारी झाली. आता विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे.

Ind vs Eng 2nd ODI : रोहितनंतर, गिलनेही ठोकले अर्धशतक, दोघांमध्ये 110+ धावांची भागीदारी

रोहित शर्मानंतर शुभमन गिलनेही अर्धशतक झळकावले आहे. त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 15वे अर्धशतक 45 चेंडूत पूर्ण केले. दोघेही जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत. 15 षटकांनंतर भारताचा स्कोअर 114/0 आहे.

Ind vs Eng 2nd ODI Live : रोहित शर्माने ठोकले 30 चेंडूत अर्धशतक...

रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 58 वे अर्धशतक फक्त 30 चेंडूत पूर्ण केले आहे. यादरम्यान, शुभमन गिल देखील त्याला साथ देत आहे. दोघांमध्ये 70+ धावांची भागीदारी झाली आहे.

Ind vs Eng 2nd ODI : फ्लड लाईट्स पुन्हा बिघडली...

भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात फ्लड लाईट्स पुन्हा बिघडली आहेत. फ्लडलाइट्स बंद पडल्यामुळे सामना 6:13 वाजता थांबवण्यात आला. जो परत 6 वाजून 16 मिनटाला परत सुरू झाला, पण परत लाईट गेली.

रोहित शर्मा दिसला जुना अवतार; टीम इंडियाची तुफानी सुरुवात! पण अचानक थांबवण्यात आला सामना, जाणून घ्या कारण

सामना 6:13 वाजता थांबवण्यात आला. याचे कारण फ्लडलाइटचे बिघाड आहे. मैदानावर कमी प्रकाश असल्याने खेळाडूंना खेळण्यात अडचणी येतात. सहा षटके पूर्ण झाली आहेत आणि भारताचा स्कोअर 47/0 आहे. रोहित 29 धावांसह आणि गिल 16 धावांसह खेळत आहे.

Ind vs Eng 2nd ODI Live : एक चेंडू राहिला असताना इंग्रजांचा खेळ खल्लास!

इंग्लंडचा संघ 49.5 षटकांत 304 धावांवर ऑलआउट झाला आहे. शेवटच्या षटकात लियाम लिव्हिंगस्टोन धावबाद झाला. त्याने 32 चेंडूत 41 धावा केल्या. यानंतर मार्क वूड धावबाद झाला. साकिब महमूद नाबाद राहिला.

Ind vs Eng 2nd ODI : सर जडेजाची कमाल! 3 स्टार खेळाडूची केली शिकार अन् इंग्रजांचे मोडले कंबरडे 

जडेजा शानदार गोलंदाजी करत आहे. त्याने आता जेमी ओव्हरटनला बाद करून सामन्यातील तिसरी विकेट घेतली. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ओव्हरटन झेलबाद झाला.




Ind vs Eng 2nd ODI : रवींद्र जडेजाने इंग्लंडला दिला पाचवा धक्का!

रवींद्र जडेजाने जो रूटला बाद करून भारताला पाचवे यश मिळवून दिले आहे. अर्धशतक झळकावल्यानंतर 72 चेंडूत 69 धावा काढून रूट बाद झाला. रूटने त्याच्या खेळीदरम्यान सहा चौकार मारले. या सामन्यातील जडेजाची ही दुसरी विकेट आहे. 43 षटकांच्या अखेरीस इंग्लंडने पाच विकेट गमावून 250 धावा केल्या आहेत.

Ind vs Eng 2nd ODI : इंग्लंडला चौथा धक्का! हार्दिक पांड्याने जोस बटलरला पाठवले पॅव्हेलियनमध्ये

हार्दिक पांड्याने जोस बटलरला आऊट करून इंग्लंडला चौथा धक्का दिला आहे. 35 चेंडूत दोन चौकारांसह 34 धावा काढून बटलर बाद झाला.

Ind vs Eng 2nd ODI : इंग्लंडची धावसंख्या 200 धावा पार...

जो रूट आणि कर्णधार जोस बटलर यांच्यातील चांगल्या भागीदारीच्या मदतीने इंग्लंडने 35 षटकांच्या अखेरीस 200 धावा पूर्ण केल्या आहेत.

Ind vs Eng 2nd ODI : हर्षित राणाने इंग्लंडला दिला तिसरा धक्का

हर्षित राणाने इंग्लंडला तिसरा धक्का दिला आहे. हॅरी ब्रुकने मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. ब्रूक 52 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह 31 धावा काढून बाद झाला होता.

Ind vs Eng 2nd ODI : इंग्लंडने 150 धावांचा टप्पा ओलांडला

29 षटकांनंतर इंग्लंडने दोन विकेट गमावून 165 धावा केल्या. सध्या जो रूट आणि हॅरी ब्रुक क्रीजवर आहेत. त्याआधी, वरुणने फिल साल्टला आणि जडेजाने बेन डकेटला बाद केले होते. सॉल्ट 26 धावा आणि डकेट 65 धावा करून आऊट झाले.

Ind vs Eng 2nd ODI : चक्रवर्तीनंतर जडेजाने मोडले इंग्रजांचे मोडले कंबरडे, तुफानी खेळीनंतर बेन डकेट आऊट

फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीनंतर रवींद्र जडेजाने बेन डकेटला आऊट करत इंग्लंडला दुसरा मोठा धक्का दिला आहे. डाकेथने शानदार फलंदाजी केली आणि अर्धशतक झळकावले. 56 चेंडूत 10 चौकारांसह 65 धावा काढल्यानंतर डॅकेथ बाद झाला. इंग्लंडने 16 षटकांत दोन गडी गमावून 102 धावा केल्या. सध्या हॅरी ब्रुक जो रूटसोबत क्रीजवर आहे.

Ind vs Eng 2nd ODI : वरुण चक्रवर्तीने तोडली इंग्लंडची मोठी भागीदारी, इंग्रजांना पहिला धक्का

फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने अखेर भारताला पहिला विजय मिळवून दिला. बेन डकेटसोबत चांगली भागीदारी करणाऱ्या सलामीवीर फिल साल्टला वरुणने आऊट केले. 29 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 26 धावा काढल्यानंतर सॉल्ट बाद झाला. यासोबतच, साल्ट आणि डेकेथ यांच्यातील पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी संपुष्टात आली.

Ind vs Eng 2nd ODI : इंग्लंडच्या डावाला सुरुवात...

भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यासाठी, फिल सॉल्ट आणि बेन डकेट डावाची सुरुवात करण्यासाठी आले आहेत, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी आला आहे.

Ind vs Eng 2nd ODI : इंग्लंडची प्लेइंग - 11

फिल साल्ट, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, गस अ‍ॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड, साकिब महमूद.

Ind vs Eng 2nd ODI Live : टीम इंडियाची प्लेइंग - 11

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.

Ind vs Eng 2nd ODI Live : रोहित शर्माने अखेर घेतला मोठा निर्णय, टीम इंडियात 2 मोठे बदल 

भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. यशस्वी जैस्वालच्या जागी गेल्या सामन्यात खेळू न शकलेल्या विराट कोहली संघात परतला आहे. त्याच वेळी, मनगटाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या जागी वरुण चक्रवर्तीला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

Ind vs Eng 2nd ODI Live : इंग्लंडने जिंकली नाणेफेक

भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग-11 मध्ये तीन बदल केले आहेत. मार्क वूड, गस अ‍ॅटकिन्सन आणि जेमी ओव्हरटन यांना संघात स्थान देण्यात आले आहे.

Ind vs Eng 2nd ODI : मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीचे पदार्पण!

मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला पदार्पणाची संधी मिळाली आहे. त्याला एकदिवसीय कॅप देण्यात आली आहे.  

Ind vs Eng 2nd ODI : विराट कोहली परतणार, रोहित शर्मा घेणार विश्रांती; कटकमध्ये टीम इंडियाची प्लेइंग-11 बदलणार
Ind vs Eng 2nd ODI : एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना कटकमध्ये...

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळला जाईल. नागपूरमध्ये खेळलेला पहिला एकदिवसीय सामना टीम इंडियाने 4 विकेट्सने जिंकला होता आणि आता ते मालिका जिंकण्याचे लक्ष्य असेल.

पार्श्वभूमी

India vs England 2nd ODI Cricket Update : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारतीय संघाने शुभ संकेत दिले, इंग्लंडविरुद्ध नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील सहज विजयानंतर, कटकमध्येही टीम इंडियाने बाजी मारली आहे. रविवार 9 फेब्रुवारी रोजी खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 305 धावांचे लक्ष्य सहज गाठले आणि सामना आणि मालिका 4 विकेट्सने जिंकली. टीम इंडियाच्या विजयापेक्षाही खास म्हणजे या सामन्यात कर्णधार रोहित शर्माचे फॉर्ममध्ये पुनरागमन ज्याने जवळजवळ एक वर्षानंतर शानदार शतकी खेळी खेळून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी चांगले संकेत दिले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.