Ind vs Ban Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत आणखी एक मोठा विक्रम करण्याची सुवर्णसंधी आहे. ही कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होत असून सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील कारण तो ऐतिहासिक कामगिरीच्या जवळ आहे. अवघ्या 58 धावा करून कोहली 147 वर्षे जुना विक्रम मोडत नवीन इतिहास रचण्याच्या तयारीत आहे.
विराट कोहली (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 हजार धावा पूर्ण करण्यापासून फक्त 58 धावा दूर आहे. जर त्याने या धावा केल्या तर 600 पेक्षा कमी डावात ही कामगिरी करणारा विराट कोहली जगातील पहिला क्रिकेटपटू ठरेल. आतापर्यंत हा विक्रम भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याने 623 डावांमध्ये 27 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. सचिनचा हा विक्रम मोडून कोहली क्रिकेट इतिहासात नवा इतिहास रचू शकतो.
विराट कोहली पहिला खेळाडू ठरणार-
विराट कोहलीने आतापर्यंत 591 आंतरराष्ट्रीय डावात 26,942 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात केवळ सचिन तेंडुलकर, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा यांनाच 27 हजार धावांचा टप्पा गाठता आला आहे. कोहली 147 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात 600 पेक्षा कमी डावात 27000 धावा करणारा पहिला क्रिकेटर ठरणार आहे.
विराट कोहलीची आतापर्यंतची कामगिरी-
विराट कोहलीने आतापर्यंत 113 कसोटी सामने खेळले आहेत. 113 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 49.1 च्या सरासरीने 8848 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 30 अर्धशतके आणि 29 शतकांचा समावेश आहे. विराट कोहलीचा कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 254 धावा आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 295 एकदिवसीय सामन्यांमध्ये 93.5 च्या इकॉनॉमीसह 13906 धावा केल्या आहेत. यामध्ये 72 अर्धशतके आणि 50 शतकांचा समावेश आहे. कोहलीची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या 183 धावा आहे. विराट कोहलीने 125 आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीत 137 च्या इकॉनॉमीसह 4188 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 38 अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 122 आहे.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
बांगलादेशचा संपूर्ण संघ:
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन कुमेर दास, मेहिदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्किन अहमद, मोहम्मद. सय्यद खालेद अहमद, जाकेर अली आनिक
संबंधित बातमी:
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया चेन्नईत पोहचली; रोहित शर्मासोबत कोण कोण?