'भाई, एक फिल्डर इधर आएगा'; ऋषभ पंत बांगलादेशची फिल्डिंग सेट करतो तेव्हा...,Video एकदा बघाच!
India vs Bangladesh: ऋषभ पंत जेव्हा शतक करण्याच्या जवळ होता. त्यावेळी मैदानात एक मजेशीर किस्सा पाहायला मिळाला.
India vs Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्या पहिला कसोटी सामना चेन्नईत खेळवण्यात येत आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस असून भारतीय संघाने सध्या 450 हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे. दिवसाच्या सुरुवातीपासूनच ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि शुभमन गिलने बांगलादेशच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. ऋषभ पंत आणि शुभमन गिल या टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी दमदार शतक झळकावले.
ऋषभ पंत (Rishabh Pant) जेव्हा शतक करण्याच्या जवळ होता. त्यावेळी मैदानात एक मजेशीर किस्सा पाहायला मिळाला. फलंदाजी करत असताना ऋषभ पंतने चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट केली. विशेष म्हणजे बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोनेही याला सहमती दर्शवली. ऋषभ पंतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Rishabh Pant Setting Bangladesh Field 😭😅
— Rishabhians Planet (@Rishabhians17) September 21, 2024
Ms Dhoni In 2019 WC Did The Same Vs Bangladesh 🥸 pic.twitter.com/5hJg4AOPeh
634 दिवसांनंतर ऋषभ पंतचं शतक-
बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने गोलंदाजांना धू धू धुतले. 124 चेंडूत ऋषभ पंतने आपले शतक पूर्ण केले. तर 128 चेंडूत 109 धावा करत ऋषभ पंत (Rishabh Pant) बाद झाला. ऋषभ पंतने शतक झळकवल्यानंतर त्याच्यासह संपूर्ण मैदान भावूक झाल्याचं दिसून आले. मैदानात उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांपासून रोहित शर्मा, विराट कोहली आणि ड्रेसिंग रुममधील सर्व खेळाडूंनी उभे राहत ऋषभ पंतचे कौतुक केले. ऋषभ पंतने या खेळीत 13 चौकार आणि 4 षटकार टोलावले. ऋषभ पंत शतक झळकवून बाद झाल्यानंतर शुभमन गिलने देखील शतक केले. शुभमन गिल सध्या 162 चेंडूत 101 धावा केल्यानंतर खेळत आहे. शुभमन गिलने या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत.
बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचं लक्ष्य-
भारतीय संघाने दुसरा डाव 287 धावांवर घोषित केला. भारताने पहिल्या डावात 376 धावा केल्या होत्या. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचं आव्हान असणार आहे. यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्माने दुसऱ्या डावाची सुरुवात करण्यासाठी आले. यादरम्यान रोहित 5 धावा करून बाद झाला तर यशस्वी 10 धावा करून बाद झाला. विराट कोहली 17 धावा केल्या. यानंतर गिल आणि पंत यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली. या दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली. गिलने 176 चेंडूंचा सामना करत नाबाद 119 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि 4 षटकार मारले. तने अप्रतिम कामगिरी केली. त्याने 128 चेंडूंचा सामना करत 109 धावा केल्या. पंतच्या खेळीत 13 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.
संबंधित बातमी:
बाद नव्हता, तरीही कोहलीने DRS घेतला नाही; मैदान सोडताच रोहित शर्मा अन् अम्पायरच्या रिॲक्शनची चर्चा