India Cricket Team Schedule 9 October : क्रिकेट प्रेमीसाठी बुधवार धमाकेदार ठरणार आहे. एकीकडे भारतीय पुरुष क्रिकेट संघ घरच्या मैदानावर टी-20 मध्ये बांगलादेशचे यजमानपद भूषवत आहे, तर दुसरीकडे महिला क्रिकेट संघ दुबईत होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील पुरुष क्रिकेट संघ आणि हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला क्रिकेट संघ एकाच दिवशी मैदानात उतरणार आहेत. वेळेतही फारसा फरक नाही. कोणत्या टीव्ही चॅनेलवर हे सामने थेट प्रक्षेपित केले जातील आणि तुम्ही मोबाइलवर ऑनलाइन स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता. हे सर्व जाणून घेऊया....


भारतीय पुरुष क्रिकेट संघ सध्या बांगलादेश (IND vs BAN) सोबत मायदेशात टी-20 मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला टी-20 सामना ग्वाल्हेरमध्ये खेळला गेला होता, ज्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला होता. दुसरा टी-20 सामना बुधवारी (09 ऑक्टोबर) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी सात वाजल्यापासून खेळवला जाईल. टीम इंडिया मालिकेत 1-0 ने पुढे आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका जिंकायची आहे.


भारतीय महिला क्रिकेट संघ बुधवारी (09 ऑक्टोबर) टी-20 वर्ल्ड कपमध्ये तिसरा साखळी सामना खेळणार आहे. न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. आता त्याचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. हा सामना दुबईत खेळवला जाणार आहे. भारतीय महिला संघ तिसरा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळेल.


भारतीय पुरुष संघ दिल्लीत सात वाजता मैदानात उरलेल तर भारतीय महिला संघ अर्धा तास नंतर 7.30 वाजता दुबईत खेळले. दोन्ही सामने वेगवेगळ्या चॅनलवर प्रसारित होणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश मालिका सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 वर होईल तर स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर असेल. टी-20 महिला वर्ल्ड कप सामना स्टार स्पोर्ट्सवर प्रसारित केला जाईल तर हॉट स्टारवर स्ट्रीमिंगचा आनंद घेता येईल.


हे ही वाचा -


Haryana Vidhansabha Election Results 2024: काँग्रेसच्या उमेदवारासाठी वीरेंद्र सेहवाग मैदानात उतरला; हरियाणातील अनिरुद्ध चौधरी आघाडीवर की पिछाडीवर?


5 वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती; द. अफ्रिकेचा कोच फिल्डिंगसाठी मैदानात उतरला, झेप घेत चेंडू अडवला, Video


Haryana Election Results: ऑलिम्पिकमध्ये अपात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश, थेट हरियाणाच्या निवडणुकीत उतरली; विनेश फोगाट आघाडीवर की पिछाडीवर?


IPL : विजय...पराभव, काहीच फरक पडत नाही; आयपीएलच्या एका हंगामातून संघ मालकांची कोट्यवधींची कमाई