IPL: विजय...पराभव, काहीच फरक पडत नाही; आयपीएलच्या एका हंगामातून संघ मालकांची कोट्यवधींची कमाई
आयपीएल संघ दरवर्षी जवळपास 300 कोटी रुपये कमावतात. यापैकी, सुमारे 160-165 कोटी रुपये खर्च केल्यानंतर, संघांना सुमारे 130-140 कोटी रुपयांचा नफा होतो. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीएल संघांकडे उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत, जसे की सामन्याच्या तिकिटांची विक्री, स्थानिक प्रायोजकत्व, चॅम्पियनशिप बक्षीस रक्कम, ब्रँड प्रायोजकत्व, खेळाडूंच्या जर्सी आणि हेल्मेटवरील कंपनी लोगो असतो, यामधून फँचायझीची चांगली कमाई होते. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
आयपीएलचा करार 9000 ते 10000 कोटी रुपयांचा आहे. त्याचा 50 टक्के वाटा संघांमध्ये विभागलेला आहे.
प्रत्येक संघाला सुमारे 450 ते 500 कोटी रुपये मिळतात. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
आयपीएल 2024 जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला 20 कोटी रुपये मिळाले. तर उपविजेत्या सनरायझर्स हैदराबादला 12.5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
बीसीसीआयचे आयपीएल 2023 मधील एकूण उत्पन्न 11,769 कोटी रुपये होते. हे जगभरातील इतर लीगपेक्षा खूप जास्त आहे. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
दरम्यान, आयपीएल 2025 च्या स्पर्धेची (IPL 2025) उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. लवकरच मेगा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे.