IND vs AUS WTC Final 2023 LIVE : भारताचा पराभव, दुसऱ्यांदा चषकाची हुलकावणी
WTC Final 2023, IND vs AUS : टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघांमधली जागतिक कसोटी (World Test Championship Finals) विजेतेपदाची फायनल सुरु झाली आहे.
LIVE
Background
WTC Final 2023, IND vs AUS : टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघांमधली जागतिक कसोटी (World Test Championship Finals) विजेतेपदाची फायनल सुरु झाली आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमध्ये फायनलची लढत लंडनच्या ओव्हल मैदानावर रंगणार आहे. याअगोदर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत आयसीसी अंडर-19, टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकांसह चॅम्पियन्स कपही जिंकलेला आहे. दोन्ही देशांकडे आयसीसीच्या सर्वाधिक 11-11 ट्रॉफी आहेत. त्यामुळे जागतिक कसोटी विजेतेपदाची फायनल जिंकून आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकण्याचा बहुमान मिळविण्यासाठी दोन्ही संघ मैदानावर कौशल्यपणाला लावण्यासाठी आतूर झाले आहेत. त्यामुळे कसोटी जिंकून टीम इंडिया इतिहास घडविणार की ऑस्ट्रेलिया? याकडे क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.
दोन्ही संघांमधील सामना 7 जून, बुधवारपासून लंडनमधील ओव्हल ग्राउंडवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सामना सुरू होईल. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्याबाबत बोलायचं झालं तर, या मैदानावर ऑस्ट्रेलियानं सर्वाधिक सामने खेळले आहेत. तर टीम इंडियानं कांगारुंच्या तुलनेत कमी सामने खेळले आहेत. दरम्यान, दोन्ही संघांचा रेकॉर्ड फारसा खास नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघानं लंडनच्या ओव्हल ग्राउंडवर 38 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यापैकी 7 सामने जिंकले आहेत.
तर टीम इंडियानं 14 सामने खेळले आहेत, त्यापैकी 2 सामने जिंकले आहेत. अशातच दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 106 कसोटी सामने खेळवण्यात आले आहे. त्यापैकी ऑस्ट्रेलियानं 44 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियानं केवळ 32 सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियापेक्षा ऑस्ट्रेलियाचं पारडं काहीसं जड आहे. ओव्हल ग्राउंडवर टीम इंडियानं आपला शेवटचा सामना 2021 मध्ये खेळला होता. त्या सामन्यात टीम इंडियानं विजयाला गवसणी घातली होती. तर, ऑस्ट्रेलियाला 2019 मध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
लाईव्ह स्ट्रिमिंग
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून टीव्हीवर थेट प्रक्षेपण होणार आहे. दूरदर्शनवर या सामन्याचे मोफत थेट प्रक्षेपण करणार आहे. याशिवाय, डिस्ने प्लस हॉटस्टारच्या माध्यमातून सामना थेट प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही हा सामना मोबाईलवरही थेट पाहू शकणार आहात.
WTC च्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया स्क्वॉड
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशान किशन (विकेटकीपर), केएस भरत (विकेकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट
टीम इंडियाला पुन्हा एकदा अपयश
टीम इंडियाला पुन्हा एकदा जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरण्यात अपयश आलं. लंडनच्या ओव्हल मैदानात खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 209 धावांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला विजयासाठी 444 धावांचं आव्हान दिलं होतं. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 86 धावांच्या भागिदारीनं भारताच्या आव्हानात धुगधुगी कायम राखली होती. पण स्कॉट बोलँडनं विराट कोहली आणि रवींद्र जाडेजाला लागोपाठच्या चेंडूंवर माघारी धाडून टीम इंडियाची पाच बाद 179 अशी बिकट अवस्था केली. मग मिचेल स्टार्कनं अजिंक्य रहाणेला माघारी धाडलं. त्या तीन धक्क्यांमधून न सावरलेला भारताचा डाव 234 धावांवर आटोपला. आणि ऑस्ट्रेलियानं जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरलं.
ऑस्ट्रेलियाचा 209 धावांनी विजय...
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चषकावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाव कोरलेय. ओव्हल येथे झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 209 धावांनी विराट पराभव केला. दुसऱ्या डावात 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 234 धाावंवर आटोपला. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी खराब फटकेबाजी करत आपल्या विकेट फेकल्या, त्यामुळेच टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसलाय. रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा आणि चेतेश्वर पुजारा यांना मोठी खेळी करता आली नाही.
भारताचा पराभव
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये टीम इंडियाचा पराभव....
शिखर भरत बाद, भारताला नववा धक्का
शिखर भरत बाद, भारताला नववा धक्का
भारताची पराभवाच्या दिशेने वाटचाल
उमेश यादव एका धावेवर बाद झालाय.. भारताला आठवा धक्का बसलाय.