IND Vs AUS: ऑस्ट्रेलियाने 406 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला असून विजयासाठी टीम इंडियासमोर 407 धावांचं लक्ष ठेवलं आहे. भारतीय डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी केली आहे.
चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सेशनपर्यंत ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सच्या बदल्यात 312 धावांची मजल मारली आहे आणि 406 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने आपला डाव घोषित केला असून टीम इंडियासमोर विजयासाठी 407 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात 338 धावा केल्या होत्या. टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात 244 धावा केल्याने ऑस्ट्रेलियाला 94 धावांची आघाडी मिळाली होती. आता ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी सहा विकेट्सच्या बदल्यात 312 धावा केल्या आणि आपला डाव घोषित केला.
टी टाइमच्या पहिला कॅमरन ग्रिनने धडाकेबाज खेळी करत 84 धावा केल्या. त्याने कर्णधार टिम पेन (नाबाद 39) सोबत सहाव्या विकेटसाठी 104 धावांची भागिदारी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत पोहचली
रोहित शर्माचा विक्रम
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या सिडनी येथे खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या नावावर एक विक्रम झाला आहे. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या भूमीत स्वत:च्या षटकारांची शंभरी गाठली आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. इंग्लंडचा इयन मॉर्गन 63 षटकारांसह दुसर्या स्थानावर आहे. रोहितने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 424 षटकार ठोकले आहेत.
टीम इंडियाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून रोहित शर्मा आणि शुभमन गिल भारतीय डावाची सुरुवात सावधपणे केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहेत. सिडनी कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये आघाडी मिळवण्याची संधी आहे.
संबंधित बातम्या: