IND vs AUS  : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना सिडनी येथे खेळला जात आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी रोहित शर्मा आणि शुभमन गिलने टीम इंडियाला चांगली सुरुवात केली. मात्र रोहित शर्मा केवळ 26 धावा करून बाद झाला. बाद होण्यापूर्वी रोहित शर्मानेही एक नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे.


रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या भूमीत स्वत:च्या षटकारांची शंभरी गाठली आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. इंग्लंडचा इयन मॉर्गन 63 षटकारांसह दुसर्‍या स्थानावर आहे. रोहितने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 424 षटकार ठोकले आहेत.


उपाहारापर्यंत भारताच्या 4 बाद 180 धावा


तिसऱ्या दिवशी उपाहारासाठी खेळ थांबला. हे सत्र दोन्ही संघांसाठी चांगलं ठरलं असं म्हणता येईल. भारतीय संघाने या सत्रात 84 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाला अजिंक्य रहाणेची महत्त्वाची विकेट घेण्यात यश आहे. हेजलवूड जबरदस्त चपळाई दाखवत हनुमा विहारीला रनआऊट करुन आणखी एक यश मिळवलं परंतु या संपूर्ण सत्रात चेतेश्वर पुजारा मजबुतीने उभा राहिला. उपाहाराला खेळ थांबला त्यावेळी भारतीय संघाने चार विकेट्सच्या मोबदल्यात 180 धावा केल्या होता. पुजारा 42 आणि रिषभ पंत 29 धावांवर खेळत आहे.


शक्रवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने दोन विकेट्सच्या मोबदल्यात 96 धावा केल्या होत्या खेळ संपला त्यावेळी चेतेश्वर पुजारा 9 आणि अजिंक्य रहाणे 5 धावांवर खेळत होते.


दरम्यान या आधी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर आटोपला. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच 300 धावांचा टप्पा पार केला. स्टीव स्मिथचा फॉर्म परत येणं ही ऑस्ट्रेलियासाठी दिलासादायक गोष्ट आहे. स्मिथच्या 131, लाबुशेनच्या 91 आणि पुकोवस्तीच्या 62 धावांच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 338 धावा केल्या. तर भारतासाठी रवींद्र जडेजाने चार, जसप्रीत बुमरा आणि नवदीप सैनीने प्रत्येकी दोन तर मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली.


भारत आणि ऑस्ट्रेलियांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांने 1-1 सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत कोणताही संघ तिसरी कसोटी जिंकणे पसंत करेल. मेलबर्न क्रिकेट मैदानावरील कामगिरीला  कायम ठेवावं लागणार आहे. तर ऑस्ट्रेलियाला संघ दुसर्‍या कसोटीतील पराभवाला मागे सारून तिसरी कसोटी कशी जिंकता येईल याकडे पाहावे लागणार आहे.