एक्स्प्लोर

India vs Australia: रोहित-विराट का, शामी का, सबका बदला लेगा हमारा उदय सहारन; 84 दिवसांनी टीम इंडिया जिंकणार वर्ल्डकप?

India vs Australia Final: वर्षभरात टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसऱ्यांदा अंतिम सामना होणार आहे. यापूर्वीच्या दोन सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागता होता.

India vs Australia Final U19 World Cup 2024: ICC अंडर-19 विश्वचषक 2024 (U19 World Cup 2024) च्या अंतिम फेरीत भारतीय क्रिकेट संघाचा (India National Cricket Team) सामना ऑस्ट्रेलियाशी (Australia) होणार आहे. दोन्ही संघांमधील हा अंतिम सामना रविवारी (11 फेब्रुवारी) बेनोनी येथील विल्मूर पार्क येथे खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियानं पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 2 विकेट्सनी पराभव केला आणि थाटात विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 1 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. 

वर्षभरातील 'ही' तिसरी अंतिम फेरी

वर्षभरात टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसऱ्यांदा अंतिम सामना होणार आहे. यापूर्वीच्या दोन सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागता होता. टीम इंडिया 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील 'द ओव्हल' येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध WTC फायनल खेळवण्यात आली होती. त्या सामन्यात टीम इंडियाला तब्बल 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर 19 नोव्हेंबरला क्रिकेट विश्वचषक 2023 चा अंतिम सामना टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवामुळे टीम इंडियाचं तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं. पराभवानंतर भारतीय खेळाडू आणि चाहत्यांचे डोळे ओलावले होते. विश्वचषक 2023 मधील पराभवाच्या जखमा अजूनही भरल्या नाहीत. आजही देशभरातील क्रिकेट प्रेमींच्या मनात कांगारुंविरुद्धच्या पराभवाची सल कायम आहे. पण याच पराभवाचा बदला घेण्याची संधी पुन्हा एकदा टीम इंडियाकडे चालून आली आहे. त्यामुळे हिटमॅन रोहित शर्मा, रनमशीन विराट कोहली आणि टीम इंडियाचा हुकुमी एक्का मोहम्मद शामीच्या डोळ्यांतील अश्रूंचा बदला टीम इंडिया अंडर-19 ता कर्णधार उदय सहारन आपल्या धुरंधरांसह घेणार आहे. 

वर्ल्डकप 2023 च्या फायनलमधील पराभवाचा बदला उदयसेना घेणार 

आता भारताच्या युवा संघाला विश्वचषक फायनलमध्ये रोहित ब्रिगेडचा ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. अवघ्या 84 दिवसांनी टीम इंडियाकडे कांगारूंना धूळ चारण्याची संधी चालून आली आहे. रोहितचा, कोहलीचा, शामीचा सगळ्यांचा बदला उदय नक्कीच घेईल, असा विश्वासच जणून भारतीय क्रिडाप्रेमींच्या मनात निर्माण झाला आहे. भारतीय कर्णधार उदय सहारनही चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या धुरंधरांसह सज्ज आहे. 

उदय सहारनच्या नेतृत्वाखालील अंडर-19 संघ ही मोठी संधी गमावू इच्छित नाही. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाप्रमाणेच ऑस्ट्रेलियाची कामगिरीही उत्कृष्ट होती आणि त्यांनी एकही सामना न गमावता अंडर-19 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत अंतिम सामना अत्यंत चुरशीचा होणार हे मात्र नक्की.

अंतिम फेरीत टीम इंडियाचाच वरचष्मा 

अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये आतापर्यंत भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन लढती झाल्या आहेत. दोन्ही वेळा भारतीय क्रिकेट संघानं शानदार विजय मिळवत कांगारूंना धूळ चारली आहे. आता तिसऱ्यांदा अंतिम फेरीत दोन्ही संघांमध्ये टक्कर होणार आहे. जर भारतीय संघ जिंकला तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये विजयाची हॅट्रीक होईल. याआधी भारतीय क्रिकेट संघानं 2012 आणि 2018 मध्ये विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. इंग्लंडचा पराभव करून टीम इंडियानं गेल्या विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं होतं. भारतीय क्रिकेट संघ अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. 

टीम इंडियानं 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कपवर कब्जा केला होता. याशिवाय 2016 आणि 2020 मध्ये भारत उपविजेता ठरला आहे. भारतीय संघाची नजर सहाव्यांदा विजेतेपदावर आहे. भारतानंतर, ऑस्ट्रेलियानं सर्वाधिक तीन वेळा अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे. 1998, 2002 आणि 2010 च्या मोसमात त्याने हे विजेतेपद पटकावले आहे. त्याला दोनदा अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. या दोन्ही वेळा भारतीय क्रिकेट संघानं कांगारूंचा पराभव केला होता. याशिवाय पाकिस्ताननं दोन वेळा, तर बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडने प्रत्येकी एकदा विजय मिळवला.

अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा रेकॉर्ड 

2000 सीझन Vs श्रीलंका : 6 विकेट्सनी विजय  
2008 सीझन Vs साउथ अफ्रीका : 12 रन्सनी विजय 
2012 सीझन Vs ऑस्ट्रेलिया : 6 विकेट्सनी विज
2018 सीझन Vs ऑस्ट्रेलिया : 8 विकेट्सनी विज
2022 सीझन Vs इंग्लैंड : 4 विकेट्सनी विज

अंडर-19 भारतीय संघ : उदय सहारन (कर्णधार), अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशु मोलिया, मुशीर खान, अरावेली अवनीश राव (विकेटकीपर), सौमी कुमार पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (विकेटकीपर), धनुष गौडा, आराध्य शुक्ला, राज लिम्बानी, नमन तिवारी. 

अंडर-19 ऑस्ट्रेलियाचा संघ : हॅरी डिक्सन, सॅम कोनस्टास, ह्यू वीबगेन (कर्णधार), हरजस सिंह, रयान हिक्स (विकेटकीपर), टॉम कॅम्पबेल, ओलिवर पीक, राफ मॅकमिलन, टॉम स्ट्राकर, महली बियर्डमॅन, कॅलम विडलर, लाचलान एटकेन, चार्ली एंडरसन, हरकीरत बाजवा, एडन ओ कॉनर.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pathum Nissanka Double Century: श्रीलंकेच्या 'निसांका'चं झंजावती वादळ, झळकावलं द्विशतक, दिग्गजांशी बरोबरी, तर हिटमॅन रोहित शर्माला टाकलं मागे

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget